Video | जद हदीद याच्या गर्लफ्रेंडने दिली आकांक्षा पुरी हिला मोठी धमकी, थेट म्हणाली, यापुढे…

| Updated on: Aug 18, 2023 | 8:06 PM

जद हदीद आणि आकांक्षा पुरी हे गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचे कारण ही मोठे आहे. जद हदीद आणि आकांक्षा पुरी यांच्यावर बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये असताना मोठी टिका ही करण्यात आली होती. जद हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी चक्क कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केले होते.

Video | जद हदीद याच्या गर्लफ्रेंडने दिली आकांक्षा पुरी हिला मोठी धमकी, थेट म्हणाली, यापुढे...
Follow us on

मुंबई : आकांक्षा पुरी आणि जद हदीद (Jad Hadid) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आहेत. आकांक्षा पुरी हिने बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात असताना कॅमेऱ्यासमोर तब्बल 30 सेकंद जद हदीद यांच्यासोबत लिपलाॅक केला होता. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांनी यावेळी जोरदार टिका देखील केली. आकांक्षा पुरी (Akanksha Puri) आणि जद हदीद यांच्या या कारनाम्यानंतर सलमान खान याचा पार देखील चांगलाच चढला होता. सलमान खान याने आकांक्षा पुरी हिला खडेबोल सुनावले होते.

आकांक्षा पुरी हिच्याकडून या वादानंतर स्पष्ट करण्यात आले की, फक्त दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी आपण हे केले आणि त्यामध्ये काहीच चुकीचे नाही. या प्रकारानंतर आकांक्षा पुरी हिचे चाहते देखील नाराज झाल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर काही तासांमध्ये आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरातून बाहेर पडली. आकांक्षा पुरी काही दिवस नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होती.

नुकताच आता आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्येही आकांक्षा पुरी आणि जद हदीद हे चक्क एका कार्यक्रमात किस घेताना दिसले. या व्हिडीओनंतरही अनेकांनी मोठा संताप व्यक्त करत आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांना खडेबोल सुनावले आहेत.

आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर चक्क जद हदीद याच्या गर्लफ्रेंडने आकांक्षा पुरी हिला धमकीच दिली आहे. विशेष म्हणजे जाहिरपणे आकांक्षा पुरी हिला धमकी देताना जद हदीद याची गर्लफ्रेंड दिसली. जद हदीद आणि त्याची गर्लफ्रेंड नुकताच मुंबईमध्ये स्पाॅट झाले आहेत. यावेळी पापाराझी यांनी जद हदीद याला आकांक्षा पुरी हिच्याबद्दल विचारले.

जद हदीद याला आकांक्षा पुरीबद्दल विचारताच त्याची गर्लफ्रेंड पापाराझी यांच्याकडे पाहत म्हणाली की, आकांक्षा पुरी तू जद हदीद याच्यापासून दूर राहा, ठिक आहे. यानंतर जद हदीद गर्लफ्रेंडकडे पाहून ठिक आहे म्हणत तिची किस घेतो. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करत आहेत.

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, बाई तूच या जद हदीदपासून दूर राहा तुझे भले होईल. दुसऱ्याने लिहिले की, अरे ही तर फारच खतरनाक आहे सरळ सरळ धमकी देत आहे. दुसऱ्याने लिहिले की, पोरींना या जद हदीद याच्यामध्ये असे काय दिसत आहे की, या दोघी याच्यासाठी भांडणे करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.