अंबानींच्या मुलाच्या लग्नाला सुप्रिया सुळेंची खास उपस्थिती; फोटो आले समोर
पहा अनमोल अंबानी (Anmol Ambani) आणि क्रिशा शाह (Krisha Shah) यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण
टीना आणि अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी (Jai Anmol Ambani) याने नुकतीच लग्नगाठ बांधली. रविवारी पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. अनमोलने ‘डिस्को’ (Dysco) या सोशल नेटवर्किंग कंपनीची संस्थापक क्रिशा शाहशी (Krisha Shah) लग्न केलं. या लग्नसोहळ्यातील अनमोल आणि क्रिशा यांचा पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीसुद्धा लग्नाला हजेरी लावली. या लग्नसोहळ्यातील फोटो पोस्ट करत त्यांनी नवदाम्पत्याला त्यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या इतर काही फोटोंमध्ये बच्चन कुटुंबीय पहायला मिळत आहेत. श्वेता बच्चन, जया बच्चन, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि नव्या नवेली नंदा यांनी लग्नाला हजेरी लावली.
लग्नसोहळ्यात क्रिशाने लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर भरजरी दागिने परिधान केले आहेत. तर अनमोलने मोती रंगाची शेरवानी आणि त्यावर सोनेरी रंगाचा शाल परिधान केला आहे. अनिल अंबानी यांच्या मुंबईतील पाली हिल इथल्या परिसरातील आलिशान घरात हा लग्नसोहळा पार पडला. सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर या लग्नसोहळ्यातील फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये त्या क्रिशाला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. तर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. निता अंबानी आणि त्यांची मुलगी इशासुद्धा लग्नाला उपस्थित होती.
View this post on Instagram
With Amitabh Ji Bachchan! pic.twitter.com/7az2NUdkfO
— Supriya Sule (@supriya_sule) February 21, 2022
View this post on Instagram
अंबानींची सून क्रिशा शाह आहे तरी कोण? मुंबईत राहणारी क्रिशा ही सामाजिक कार्यकर्ती आणि उद्योजिका आहे. ‘डिस्को’ या सोशल नेटवर्किंग कंपनीची ही संस्थापक आहे. क्रिशा ही युकेमधील अक्सेंचर या कंपनीत काम करत होती. मात्र भारतात परतल्यानंतर तिने स्वत:ची कंपनी स्थापन केली. क्रिशाने मानसिक स्वास्थ्याविषयीची एक मोहीमसुद्धा सुरू केली आहे. ‘#Lovenotfear’ असं या मोहिमेचं नाव आहे. क्रिशाने कॅलिफोर्निया विद्यापिठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून तिने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.