शनिदेवाची महागाथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

शनिदेव यांची महागाथा लवकरच मालिकेच्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवाची भूमिका साकारणार आहे. येत्या 8 मे पासून ही मालिका प्रसारित होणार आहे.

शनिदेवाची महागाथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
'जय जय शनिदेव'Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 4:48 PM

आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक अशा विविध विषयांच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘जय जय शनिदेव’ असं या मालिकेचं नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. अभिनेता संकेत खेडकर या मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणार आहे. याआधी त्याने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण प्रमुख भूमिका म्हणून ‘शनिदेव’ ही संकेतची पहिलीच मालिका आहे.

विशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगरचा आहे. शनिदेवाचं शणिशिंगणापूर हे देवस्थान अहमदनगरमध्येच आहे. त्यामुळे मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. नुकतीच ‘जय जय शनिदेव’ या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचं प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतंय.

हे सुद्धा वाचा

शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवाची ही कथा अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. येत्या 8 मेपासून ही कथा सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘जय जय शनिदेव’ ही मालिका येत्या 8 मेपासून रात्री 9.30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.