Jailer चे निर्माते जणू राजा हरिश्चंद्रच! आधी रजनीकांत यांना BMW, दिग्दर्शकांना पोर्शे, आता 300 सोन्याच्या नाणी भेट

'जेलर' या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर निर्माते कलानिधी मारन हे टीमवर भेटवस्तूंचा वर्षाव करत आहेत. नुकतीच त्यांनी 300 क्रू मेंबर्सना सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत.

Jailer चे निर्माते जणू राजा हरिश्चंद्रच! आधी रजनीकांत यांना BMW, दिग्दर्शकांना पोर्शे, आता 300 सोन्याच्या नाणी भेट
'जेलर'च्या निर्मात्यांकडून सोन्याची नाणी भेटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 1:54 PM

चेन्नई | 11 सप्टेंबर 2023 : रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. या चित्रपटाने कमाईचा 500 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड यशामुळे निर्माते फारच खुश आहेत. हा आनंद व्यक्त करण्यासाठी ‘सन पिक्चर्स’चे मालक आणि ‘जेलर’ या चित्रपटाचे निर्माते कलानिधी मारन यांनी 300 क्रू मेंबर्सना सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत. चित्रपटासाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी रविवारी कलानिधी यांनी त्यांना सोन्याची नाणी भेट म्हणून दिली. त्यांच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

रजनीकांत यांना कोट्यवधींची BMW

याआधी कलानिधी यांनी ‘जेलर’चे मुख्य अभिनेते रजनीकांत यांना BMW X7 ही अत्यंत महागडी गाडी भेट म्हणून दिली होती. इतकंच नव्हे तर चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन यांना शुक्रवारी त्यांनी पोर्शे ही आलिशान गाडी भेट दिली होती. कलानिधी इतक्यावरच थांबले नाहीत, तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनासुद्धा त्यांनी 1.5 कोटी रुपयांची पोर्शे कार भेट म्हणून दिली. ‘जेलर’मधील ‘कावाला’ या गाण्यालाही तुफान यश मिळालं. या गाण्यावर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी डान्सचे व्हिडीओ शूट करून पोस्ट केले होते.

कोण आहेत निर्माते कलानिधी?

एका मुलाखतीत निर्माते कलानिधी म्हणाले, “मला माहित आहे की एक चित्रपट बनवण्यासाठी प्रत्येक सदस्याची केवढी मेहनत लागते. त्यामुळे चित्रपटाच्या यशानंतर प्रत्येकाला धन्यवाद बोलणं खूप गरजेचं असतं.” कलानिधी मारन हे सन ग्रुपचे अध्यक्ष आहेत. 14 एप्रिल 1993 रोजी त्यांनी सन टीव्हीची स्थापना केली होती. ते राजकारणी दयानिधी मारन यांचे भाऊ आहेत.

हे सुद्धा वाचा

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘जेलर’ हा चित्रपट लवकरच जगभरात कमाईचा 600 कोटींचा गाठणार आहे. हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा तमिळ चित्रपट ठरला आहे. त्याआधी रजनीकांत यांच्याच ‘2.0’ या तमिळ चित्रपटाने जगभरात तगडी कमाई केली होती. जेलरनंतर रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचीही नुकतीच घोषणा झाली. ‘थलायवर 171’ असं या चित्रपटाचं नाव आहे. लोकेश कनगराज या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.