मुलाला गुपचूप बेडरुममध्ये घेऊन गेली जान्हवी; वडिलांनी सीसीटीव्ही पाहताच उचललं ‘हे’ पाऊल

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. जान्हवीच्या बेडरुममध्ये एक मुलगा होता आणि त्याला वडिलांनी पाहू नये म्हणून तिने खिडकीतून उडी मारण्यास सांगितलं होतं.

मुलाला गुपचूप बेडरुममध्ये घेऊन गेली जान्हवी; वडिलांनी सीसीटीव्ही पाहताच उचललं 'हे' पाऊल
Boney and JanhvI KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 1:32 PM

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती अभिनेता राजकुमार रावसोबत भूमिका साकारतेय. प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने एक किस्सा सांगितला. जान्हवीच्या रुममधून खिडकीद्वारे बाहेर पडताना एका मुलाला वडील बोनी कपूर यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी जान्हवीच्या खिडकीला ग्रील लावून घेतली. जान्हवी हळूच त्या मुलाला खिडकीतून बाहेर पाठवत होती. मात्र तितक्यात तिच्या वडिलांनी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे सर्व पाहिलं. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने हा किस्सा सांगितला.

जान्हवीचं जुनं घर पहिल्या मजल्यावर होतं. तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी मुंबईत विकत घेतलेलं ते पहिलं घर होतं. जान्हवीला भेटायला एक मुलगा तिच्या घरी आला होता. मात्र त्या मुलाने पुढच्या दारातून घराबाहेर पडावं, अशी तिची इच्छा नव्हती. वडिलांनी त्या मुलाला पाहू नये, म्हणून ती त्याला पहिल्या मजल्यावरून उडी मारायला सांगत होती. याविषयी तिने सांगितलं, “एकदा माझ्या रुममध्ये एक मुलगा आला होता आणि त्याला कोणी पाहू नये म्हणून मी खिडकीतून उडी मारून जाण्यास सांगितलं होतं. माझी कार तिथे होती. त्या कारवर उडी मारून खाली उतर असं मी त्याला सांगत होती. त्याने तसं केलं आणि हे सर्व माझ्या वडिलांनी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पाहिलं होतं. या घटनेनंतर त्यांनी माझ्या खिडकीला ग्रील लावून घेतली.”

हे सुद्धा वाचा

यानंतर जान्हवीने तिच्याच वडिलांचा किस्सा सांगितला. बोनी कपूर हेसुद्धा श्रीदेवी यांना भेटायला एका हॉटेलच्या रुममध्ये गेलो होते. तेव्हा त्यांनीसुद्धा खिडकीतून उडी मारली होती. “आईला भेटण्यासाठी बाबा तिच्या हॉटेल रुममध्ये गेले होते. तिथून बाहेर पडताना त्यांनी खिडकीतून उडी मारली होती. हे पाहून आईच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. तेव्हाच बाबांना समजलं की तिला मी आवडू लागलोय. आजही रात्री 10 वाजल्यानंतर जेव्हा घरात जुनी गाणी वाजू लागतात, तेव्हा बाबा मला त्यांचे आणि आईचे किस्से सांगू लागतात”, असं जान्हवीने पुढे सांगितलं. बोनी कपूर आणि श्रीदेवी हे जवळपास 22 वर्षांपासून विवाहित होते. 2018 मध्ये दुबईतील एका हॉटेलच्या बाथडबमध्ये बुडून श्रीदेवी यांचं निधन झालं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.