कथित बॉयफ्रेंड ओरहानविषयी अखेर जान्हवी कपूरने सोडलं मौन; म्हणाली..

जान्हवी एक्स बॉयफ्रेंडलाच पुन्हा करतेय डेट? चर्चांवर दिलं उत्तर

कथित बॉयफ्रेंड ओरहानविषयी अखेर जान्हवी कपूरने सोडलं मौन; म्हणाली..
Janhvi Kapoor and OrhaanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 2:34 PM

मुंबई- बॉलिवूडच्या दिवाळी पार्ट्यांदरम्यान अभिनेत्री जान्हवी कपूर ही ओरहान अवत्रमणीसोबत पहायला मिळाली. हे दोघं एकेकाळी एकमेकांना डेट करायचे असं म्हटलं जायचं. मात्र आता पुन्हा एकदा या दोघांचं पॅचअप झाल्याचं कळतंय. ओरहान आणि जान्हवी यांचं खरंच अफेअर आहे का, यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने ओरहानविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जान्हवी आणि ओरहानला बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलंय. जान्हवीने हॅलोवीन पार्टीलासुद्धा त्याच्यासोबत हजेरी लावली होती. या दोघांनी एकत्र विविध देशांमध्ये फिरायलासुद्धा गेले होते. सोशल मीडियावरही दोघं एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसतात.

हे सुद्धा वाचा

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “ओरीला (ओरहान) मी खूप वर्षांपासून ओळखते. ती एक अशी व्यक्ती आहे, जिच्यासोबत मी फक्त छान वेळच घालवला नाही तर त्याने नेहमीच माझी साथ दिली आहे. मीसुद्धा नेहमीच त्याची साथ दिली आहे. तो जेव्हा सोबत असतो, तेव्हा मला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि मी त्याच्यावर खूप विश्वास करते. असा मित्र भेटणं खूप दुर्मिळ असतं, जो तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील. तो खूप चांगला मित्र आहे.”

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

फक्त जान्हवीच नाही तर सारा अलीखान, अनन्या पांडे, शनाया कपूर, इब्राहिम खान, न्यासा यांचाही तो खूप चांगला मित्र आहे. स्टारकिड्ससोबत नेहमीच वावरत असलेल्या ओरहानने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावरही त्याचे खूप फॉलोअर्स आहेत.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

ओरहान हा पेशाने प्रशिक्षित अॅनिमेटर आहे. सारा अली खान त्याची क्लासमेट होती. ग्रॅज्युएशन पार्टीतील या दोघांचा एकत्र फोटोसुद्धा आहे. अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासाचाही तो खास मित्र आहे.

'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.