Janhvi Kapoor | गणपती विसर्जन मिरवणुकीत जान्हवीचा राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत डान्स

अभिनेत्री जान्हवी कपूरचा गणपती विसर्जन मिरवणुकीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत नाचताना दिसत आहे. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

Janhvi Kapoor | गणपती विसर्जन मिरवणुकीत जान्हवीचा राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत डान्स
Janhvi Kapoor and Shikhar PahariyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 10:53 AM

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. जान्हवीने अद्याप माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाहीर कबुली दिली नसली तरी ती शिखर पहाडियाला डेट करत असल्याचं जगजाहीर झालं आहे. शिखर हा जान्हवीचा खूप जुना मित्र आहे. नुकतेच हे दोघं एकमेकांना डेट करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघं तिरुपती बालाजीच्या दर्शनाला एकत्र गेले होते. आता या दोघांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत जान्हवी शिखरसोबत मनसोक्त नाचताना दिसतेय.

गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोलताशाच्या गजरावर जान्हवी मुक्तपणे नाचताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्याला गुलाल लावल्याचंही पहायला मिळत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी इन्स्टाग्रामवर जान्हवी आणि शिखरचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये जान्हवीसोबत शिखरसुद्धा विसर्जन मिरवणुकीत नाचताना दिसत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं असून ते बालपणीचे मित्र आहेत. विशेष म्हणजे शिखर हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

जान्हवी आणि शिखर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र मध्यंतरीच्या काळात दोघांचा ब्रेकअप झाला. काही गोष्टींवरून मतभेद झाल्याने त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ते पुन्हा एकत्र आले. शिखरला जान्हवी आणि तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत व्हेकेशनलाही जाताना पाहिलं गेलं आहे. या दोघांनी पापाराझींपासून कधीच लपण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र रिलेशनशिपबद्दल त्यांनी अद्याप जाहीर कबुलीसुद्धा दिली नाही.

जान्हवी कपूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती ‘RRR’ फेम दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवारा’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. जान्हवी आणि वरुण धवनच्या ‘बवाल’ या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.