Janhvi Kapoor लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज? खुद्द अभिनेत्रीने सांगितला ‘वेडिंग प्लान’

| Updated on: Mar 15, 2023 | 4:08 PM

कसा असेल जान्हवीच्या स्वप्नातील राजकुमार, लग्नासाठी तयार आहे अभिनेत्री देवी यांची लेक जान्हवी कपूर... लग्नाबद्दल खुद्द जान्हवी म्हणाली...

Janhvi Kapoor लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज? खुद्द अभिनेत्रीने सांगितला वेडिंग प्लान
Follow us on

मुंबई : ‘धडक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनेत्री जान्हवी कपूर हिने चाहत्यांना घायाळ केलं. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत जान्हवीने अनेकांच्या मनात घर केलं . धडक सिनेमानंतर अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मोठ्या पडद्यावर ज्याप्रमाणे अभिनेत्री सक्रिय असते त्याच प्रमाणे सोशल मीडियावर देखील जान्हवी सक्रिय असते. एवढंच नाही तर मुलखातींमध्ये जान्हवी तिच्या आवडी-निवडींवर देखील बोलताना दिसते. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत तिने स्वतःच्या ‘वेडिंग प्लान’बद्दल मोठा खुलासा केला.

‘धडक’ फेम अभिनेत्री जान्हवी कपूर हिने एका मुलाखतीत सांगितलं की, अभिनेत्रीला तिरुपती याठिकाणी लग्न करायचं आहे. मेहंदी आणि संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी तिला मयलापूर हे लोकेशन हवं आहे. घरात लग्न असलं की अनेक दिवस कार्यक्रम चालतात, पण जान्हवीला तिचं लग्न आणि लग्नापूर्वीच्या विधी फक्त दोन दिवसांमध्ये करायच्या आहेत.

लग्नानंतर सर्वांना आकार्षण असतं रिसेप्शनचं. पण जान्हवी तिच्या लग्नात रिसेप्शनच्या विरोधात आहे. अभिनेत्री किआरा अडवाणी, कतरिना कैफ यांनी ज्याप्रमाणे मोठ्या थाटात लग्न केलं, तसं लग्न जान्हवीला करायचं नाही. जान्हवीला अत्यंत साध्या पद्धतीत लग्न करायचं आहे. फक्त मोगऱ्याची फुलं आणि मेणबत्त्यांनी सजवलेल्या मंडपतान जान्हवीला लग्न करायचं आहे.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचं म्हणजे जान्हवीला तिच्या लग्नात कोणत्याही प्रकारचे भरजडीत कपडे नको असून अभिनेत्रीला साधी कांजीवरम साडी हवी आहे. मेहंदीसाठी गुलाबी रंगाचा ड्रेस आणि संगीतसाठी पिवळ्या रंगाचा ड्रेस हवा आहे. अशाप्रकारे अभिनेत्री तिचं वेडिंग प्लान सर्वांना सांगितला आहे.

जान्हवीचे आगामी सिनेमे
जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अभिनेत्री नितेश तिवारी यांच्या ‘बवाल’ सिनेमात झळकणार आहे. सिनेमात जान्हवी अभिनेता वरुण धवन याच्यासोबत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवाय जान्हवी ‘दोस्ताना 2’ आणि ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ सिनेमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

फार कमी कालावधीत जान्हवीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. मोठ्या पडद्यावर कायम सक्रिय असणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जान्हवी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.