महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवी कपूर पोहचली ‘या’ मंदिरात, गुडघे टेकवत चढल्या पायऱ्या, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Janhvi Kapoor Video : जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही तूफान सक्रिय दिसते. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जान्हवी कपूर हिचा सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवी कपूर पोहचली 'या' मंदिरात, गुडघे टेकवत चढल्या पायऱ्या, 'तो' व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 11:43 AM

मुंबई : बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत नेहमीच स्पाॅट होताना दिसते. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकमेकांना डेट करत असल्याचेही सांगितले जाते. मात्र, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाही. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

नुकताच जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया आणि आैरी यांच्यासोबत तिरुपती बालाजी मंदिरात पोहचली. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेहमीच तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जान्हवी कपूर जाते. काही दिवसांपूर्वी बहीण खुशी कपूरसोबत बालाजी मंदिरात जान्हवी पोहचली. यावेळी चक्क गुडघ्यांनी जान्हवी कपूरने पायऱ्या चढल्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर, शिखर पहाडिया आणि आैरी हे दिसत आहेत. यावेळी तिघे मंदिरात दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पायऱ्या चढून शिखर पहाडिया तर जान्हवी कपूरने गुडघे टेकवत मंदिराच्या पायऱ्या चढल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये साऊथ इंडियन जेवण करताना देखील जान्हवी कपूर ही दिसत आहे.

शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा केल्याचे सांगितले जात होते. लवकरच शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लग्न करणार असल्याचेही सांगितले जाते. शिखर पहाडिया हा अंबानींच्या पार्टीत देखील जान्हवी कपूर हिच्यासोबत पोहचला होता, यावेळीचे त्यांचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वीच विमानतळावर बोनी कपूर यांच्यासोबत शिखर पहाडिया हा दिसला. यावेळी चक्क शिखर पहाडिया याचे फोटो काढू नका, हे सांगताना बोनी कपूर हे दिसले. बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच पार्ट्यांना शिखर पहाडिया हा जान्हवी कपूर हिच्यासोबत दिसतो. शिखर पहाडिया आणि शिखर पहाडिया हे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.