माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्नासाठी तयार जान्हवी कपूर? दोन शब्दात दिलं उत्तर

Janhvi Kapoor | माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूर हिच्या लग्नाची चर्चा, पण लग्नाचा विषय निघताच अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य... काही दिवसांपूर्वी खुद्द जान्हवी हिने दिली होती नात्याला कबुली... आता असं का म्हणाली अभिनेत्री..., सर्वत्र चर्चांना उधाण...

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्नासाठी तयार जान्हवी कपूर? दोन शब्दात दिलं उत्तर
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 7:52 AM

अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. जान्हवी हिच्या कुटुंबियांनी देखील शिखर याची स्वीकार केला आहे. नुकताच, जान्हवी हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीने शिखू नावाचं पेंडेंट घातलं होतं. ज्यामुळे शिखर आणि जान्हवी यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र जान्हवी हिचं लग्न कुठे आणि कसं होणार याची देखील चर्चा रंगली आहे.

आता या सगळ्यामध्ये हे शिखर – जान्हवी तिरुपती मंदिरात लग्न करू शकतात अशी देखील माहिती मिळत आहे. जान्हवीला शिखरसोबत आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात सात फेरे घ्यायचे असल्याचं सांगितलं जात आहे.. मात्र, खुद्द जान्हवीनेच रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, जान्हवी कपूरबद्दल एका सोशल मीडिया पेजवर तिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. जान्हवीला तिरुपती मंदिरात सोनेरी कांजीवरम साडी घालवून, केसात गजरे माळून आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत शिखर पहाडियाशी लग्न करायचे आहे. शिवाय शिखर याने पारंपरिक लुंगी घालावी असं देखील पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं.

एवढंच नाहीतर, लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना केळीच्या पानावर जेवणाच्या पंगती बसल्या पाहिजेत असं देखील सांगण्यात आलं होतं. जान्हवी हिच्या मित्रांनी देखील अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. आमच्या ग्रुपमध्ये सर्वात पहिलं लग्न जान्हवीचं होईल… असं अभिनेत्रीचे मित्र म्हणाले होते.

या सर्व रंगणाऱ्या चर्चांवर जान्हवी हिने दोन शब्दात उत्तर देत, रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘कुछ भी…’ म्हणजे याठिकाणी स्पष्ट होत आहे की जान्हवी अद्याप लग्नाच्या विचारात नाही आणि तिरुपती मंदिरात अभिनेत्रीचं लग्न.. या देखील फक्त अफवा आहेत.

सांगायचं झालं तर, बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये शिखर याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुल दिली होती. जान्हवी हिचे वडील बोनी कपूर यांनी देखील एका मुलाखतीत शिखर आणि जान्हवी यांच्या नात्याला मान्यता दिली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी – शिखर यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.