सारा तेंडुलकरची जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत पार्टी; संतापलेल्या अभिनेत्रीने उचललं हे पाऊल
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हे दोघं एकत्र एकाच कारमध्ये दिसून आले होते. यानंतर आता जान्हवीने सोशल मीडियावर साराबाबत पाऊल उचलल्याचं कळतंय.
मुंबई : 11 जानेवारी 2024 | दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही काळापासून शिखर पहाडियाला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये जान्हवीने अप्रत्यक्षरित्या तिच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर शिखर आणि जान्हवी यांना तिरुपती बालाजी मंदिरात एकत्र पाहिलं गेलं. आता बॉयफ्रेंड शिखरवरूनच जान्हवी प्रचंड चिडल्याचं समजतंय. यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरला शिखरसोबत पाहिलं गेलं. सारा आणि शिखर हे एकाच गाडीत दिसले होते. कुठल्यातरी पार्टीला दोघं गेले होते. यावेळी कारमध्ये त्यांच्यासोबत इतरही काही मित्र होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर संतापलेल्या जान्हवीने साराबाबत पाऊल उचललं आहे.
बॉयफ्रेंड शिखरसोबतचा साराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जान्हवीने तिला सोशल मीडियावर अनफ्रेंड केल्याचं समजतंय. इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघींनी एकमेकांना अनफॉलो केलंय. याआधी दोघी एकमेकींना इन्स्टाग्रामवर फॉलो करायच्या. इतकंच नव्हे तर त्या एकमेकींच्या फोटोसुद्धा लाइक करायच्या. मात्र आता जान्हवीने सारापासून लांब राहण्याचं ठरवलं आहे.
सारा आणि शिखरचा व्हिडीओ
View this post on Instagram
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जान्हवी आणि शुभमन गिल एका कोपऱ्यात रडत बसले असतील’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे खरं असू शकत नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. सारा तेंडुलकरचं नाव अनेकदा क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं गेलं आहे.
‘कॉफी विथ करण 8’मध्ये करण जोहरने जान्हवीला तिच्या स्पीड डायलमध्ये असलेल्या तीन लोकांची नावं विचारली होती. त्यावर उत्तर देताना पटकन जान्हवी बोलून जाते, “पापा, खुशू आणि शिखू.” शिखू म्हणजेच शिखर पहाडिया. शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि शिखर हे भाऊ-भाऊ आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.
यावेळी जान्हवीने शिखरचं तोंडभरून कौतुकसुद्धा केलं होतं. “तो सुरुवातीपासूनच माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा राहिला आहे. प्रत्येक परिस्थितीत त्याने माझी साथ दिली. शिखरला माझ्याकडून कधीच कोणत्या अपेक्षा नव्हत्या. तो फक्त माझ्यासोबत होता. त्याने कधीच माझ्यावर कोणता दबाव टाकला नाही”, असं ती म्हणाली.