Janhvi Kapoor | जान्हवी कपूर थोडक्यात बचावली, व्हिडीओ व्हायरल, चाहतेही हैराण
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या आगामी बवाल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच वरुण धवन याच्यासोबत चित्रपटामध्ये काम करताना जान्हवी कपूर ही दिसणार आहे. आता हे महत्वाचे ठरणार आहे की, वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची जोडी काय धमाका करते.
मुंबई : बोनी कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. बवाल या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच वरुण धवन (Varun Dhawan) याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना जान्हवी ही दिसत आहे. आता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची जोडी काय धमाका करते हे बघण्यासारखे ठरणार आहे. विशेष म्हणजे वरुण धवन हा देखील चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचे या पूर्वी रिलीज झालेले चित्रपट फ्लाॅप (Movie flap) गेले आहेत. यामुळेच आता या आगामी चित्रपटाकडून दोघांनाही मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.
एका मुलाखतीमध्ये वरुण धवन याने मोठा खुलासा करत सांगितले की, ज्यावेळी बवाल चित्रपटाची शूटिंग सुरू झाली. त्यावेळी एक महिना मी अजिबातच जान्हवी कपूर हिला सेटवर बोलत नव्हतो. जान्हवी कपूर हिला सोडून मी चित्रपटाच्या सेटवर सर्वांसोबत गप्पा मारत होतो. जान्हवी कपूर हिला न बोलण्याचे कारणही तेवढेच खास होते.
नुकताच जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. जान्हवी कपूर हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, जान्हवी कपूर ही तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. काहीही झाले तरीरी जान्हवी कपूर कधीच व्यायाम करणे टाळत नाही.
View this post on Instagram
आता जान्हवी कपूर हिचा जो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडीओ व्यायाम करतानाचाच आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही थोडक्यात वाचली आहे. जान्हवी कपूर हिचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनाच मोठा धक्का हा बसलाय. चाहते या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
जान्हवी कपूरच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यायाम करत असताना तिचा तोल जातो आणि ती थोडक्यात बचावते. यानंतर जान्हवी हिला देखील धक्का बसतो आणि ती थेट तोंडाला हात लावते. आता जान्हवी कपूर हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी काळजी घेऊन व्यायाम करण्याचा सल्ला हा जान्हवी कपूर हिला दिला आहे.