Jasmin Bhasin | मस्जिदमध्ये बुरख्यात दिसली जास्मिन भसीन; नेटकरी म्हणाले ‘तू सुद्धा लवकरच फ्रीजमध्ये..’

जास्मिन आणि अलीची भेट ही रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 9’ या शोमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावर हे दोघं एकमेकांविषयी खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Jasmin Bhasin | मस्जिदमध्ये बुरख्यात दिसली जास्मिन भसीन; नेटकरी म्हणाले 'तू सुद्धा लवकरच फ्रीजमध्ये..'
Jasmin BhasinImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 12:39 PM

अबू धाबी : जास्मिन भसीन ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ती दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती सतत चाहत्यांसोबत शेअर करतेय. जास्मिनने नुकताच अबू धाबीमधल्या शेख जायद मस्जिदमधून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. जास्मिनने शेख जायद मस्जिदमध्ये एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बुरखा घातलेली दिसत आहे. यावरूनच काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

‘अखेर अली गोणीने तुला हिजाब घालायलाच लावला’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू सुद्धा येत्या काळात फ्रिजमध्ये सापडशील’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘ही सुद्धा लव्ह-जिहादची शिकार होतेय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टोला लगावला. या कमेंट्समध्ये काहींनी तिची बाजूसुद्धा घेतली. ‘मला समजत नाही की लोकं इतकी नकारात्मक टिप्पणी का करत आहेत? तिने स्वत:ला पूर्णपणे झाकलंय. हीच गोष्ट लोकांच्या पचनी पडत नसेल. याच चुकीचं काय आहे’, असं जास्मिनच्या चाहतीने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

जास्मिन भसीन तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. जास्मिनला बिग बॉस 14 मुळे अधिकाधिक प्रसिद्धी मिळाली. याच शोमध्ये तिचं अभिनेता अली गोणीसोबत अफेअरची चर्चा रंगली. बिग बॉसच्या घरात दोघांचा खुल्लमखुल्ला रोमान्स तर पहायला मिळालाच. मात्र घरातून बाहेर पडल्यानंतरही अनेकदा ही जोडी एकत्र दिसली.

जास्मिन आणि अलीची भेट ही रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 9’ या शोमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावर हे दोघं एकमेकांविषयी खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात. नंतर बिग बॉसच्या घरातही या दोघांमधील खास बाँडींग पहायला मिळाली.

मध्यंतरीच्या काळात जास्मिन आणि अलीच्या लग्नाचीही चर्चा होती. माध्यमांनी तिला लग्नाबाबत प्रश्नही विचारला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “तुम्ही सगळे माझ्या लग्नाविषयी का बोलत आहात? आम्ही सध्या एकमेकांच्या प्रेमात आहोत. सध्या आमची लग्नाची किंवा इतर कोणतीही मोठी योजना नाही. आम्हाला, अजून एकमेकांना समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आम्ही लग्नाबद्दल विचार करू.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.