मुंबई : जास्मिन भसीन ही नेहमीच चर्चेत असणारी टीव्ही अभिनेत्री आहे. जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. बिग बाॅस 14 मध्येही जास्मिन भसीन ही सहभागी झाली होती. जास्मिन भसीन हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे जास्मिन भसीन हिला सपोर्ट करण्यासाठी अली गोनी हा बिग बाॅस 14 मध्ये सहभागी झाला होता. सुरूवातीला हे दोघे आम्ही चांगले मित्र असल्याचा दावा करताना दिसले. मात्र, त्यानंतर स्पष्ट झाले की, जास्मिन आणि अली हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या काही वर्षांपासून अली गोनी (Aly Goni) आणि जास्मिन हे रिलेशनमध्ये आहेत.
काही दिवसांपूर्वी मस्जिदमध्ये बुरख्यात जास्मिन भसीन ही दिसली होती. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी जास्मिन भसीन हिचा चांगलाच क्लास लावला होता. जास्मिन भसीन हिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. इतकेच नाही तर अनेकांनी थेट तू सुद्धा लवकरच फ्रीजमध्ये श्रध्दासारखी जाणार असल्याचे देखील थेट म्हटले होते.
नुकताच जास्मिन भसीन हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये जास्मिन भसीन हिने बुरखा घालण्याचे नेमके काय कारण होते हे सांगितले आहे. जास्मिन भसीन म्हणाली की, मुळात म्हणजे मी कधीच ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही. मी माझ्या आयुष्यात नेहमीच नकारात्मक गोष्टींपासून दूर असते. ट्रोल केल्याने मला काहीच फरक पडत नाही.
पुढे जास्मिन म्हणाली, मी अबू धाबीमधील शेख जायद ग्रॅंड मस्जिदमध्ये गेले होते. त्या मस्जिदमधील काही नियम आहेत आणि मी फक्त तेच फाॅलो केले आहेत. कारण ते एक पवित्र स्थळ आहे आणि मी तेथील नियम पाळले आणि तसे संस्कार लहानपणीच माझ्या आई वडिलांनी मला दिले आहेत. मी त्या जागेचा सन्मान करते असेही जास्मिन म्हणाली आहे.
जास्मिन म्हणाली, मी ज्यावेळी सुट्ट्यांसाठी जाते त्यावेळी मी नेहमीच स्विमसूट घालते. मग ते फोटो पुढे आले तरीही लोक मला ट्रोल करतील. मुळात म्हणजे मी ट्रोलर्सकडे अजिबाच लक्ष देत नाही. मी माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देते असेही म्हणताना जास्मिन भसीन ही दिसली. सोशल मीडियावर जास्मिन भसीन हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियावरही जास्मिन भसीन ही चांगलीच सक्रिय असते.