Bigg Boss 14 | जास्मीन भसीन नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित, ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा हंगामा

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण,आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

Bigg Boss 14 | जास्मीन भसीन नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित, ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा हंगामा
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 3:23 PM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण,आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासुन बिग बॉसवरही गंभीर आरोप केले जात होते. त्यामुळे बिग बॉस 14 आधिकच चर्चेत आले होते. आता बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा बघायला मिळणार आहे. (Jasmin Bhasin saves from nomination process in bigg boss house)

बिग बॉस 14 मध्ये मंगळवारच्या एपिसोडची सुरूवात ‘मैं घर नहीं जाना’ गाण्याने करण्यात आली. या एपिसोडमध्ये मोठ्या प्रमाणात हंगामा बघायला मिळाला. एपिसोडच्या सुरूवातीलाच BB मॉलमधून निक्की तंबोलीला काही साहित्य एजाज खानने दिले. त्यावेळी तिथे जान कुमार आला म्हणाला BB च्या मॉलमधून काही साहित्य मलाही पाहिजे आहे. मात्र, एजाज खान त्याला परवानगी देत नाही. त्यानंतर जान कुमार आणि एजाज खानमध्ये जोरदार भांडणे बघायला मिळतात.

त्यानंतर बिग बॉस नॉमिनेशन प्रक्रियेतून घरातील एका सदस्याला सुरक्षित करण्याचा अधिकार कॅप्टन एजाज खानला मिळाला होता. यात एजाज खानने जास्मीन भसीनचे नाव घेतो. त्यानंतर घरात पुन्हा एकदा हंगामा सुरू झाला. एजाज खानने जास्मीन भसीनचे नाव घेतल्यानंतर पवित्रा पुनिया नाराज होते आणि रडते तिच्या म्हृणण्याप्रमाणे पवित्रा ऐवजी एजाज खानने तिला नॉमिनेशन प्रक्रियेत सुरक्षित करायला पाहिजे होते. पण एजाज खानने तसे न केल्यामुळे पवित्रा पुनियाला राग अनावर होत आहे.

एजाज खानच्या म्हणण्यानुसार, जास्मीन भसीन रेड झोनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आहे. तिथे ती संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे तिला परत रेड झोनमध्ये पाठवण्याची इच्छा त्याला नव्हती. त्यामुळे त्याने नॉमिनेशन प्रक्रियेतून जास्मीन भसीनला सुरक्षित केले. या आठवड्यात राहुल वैद्य, शार्दुल पंडित, नैना सिंह आणि रुबीना दिलक हे रेड झोनमध्ये आहेत. बाकी सर्व सदस्य सुरक्षित आहेत.

वाइल्ड कार्डवर एंट्री करून कविता कौशिक कॅप्टन झाली होती. त्यानंतर कविता कौशिक हीने बिग बॉस भेदभाव करत असल्याचा आरोप केले होते.कविता कौशिक संपूर्ण भागात नाराज दिसत होती. भागाच्या सुरूवातीलाच बेजबाबदार असल्याचा ठप्पा तिच्यावर घरातील सहा जणांनी ठेवला होता. घरामध्ये आल्या-आल्याच तिचे एजाज खानसोबत झालेले भांडण, त्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. कविता कौशिकचे म्हणणे होते की, मी एजाज खानची अनेक वेळा मदत केली, त्यांच्यासोबत मस्करी केली. पण, बिग बॉसने ते सर्व काही दाखवले नाहीतर, फक्त मी त्याच्याशी केलेले भांडणच दाखवले. माझ्या चांगला गोष्टी बिग बॉस दाखवत नाहीत, किंवा त्यावर चर्चा करत नाहीत. माझ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच दाखवल्या जातात. माझी चांगली बाजूच दाखवलीच जात नाही. बिग बॉस निक्की तंबोली, पवित्रा आणि इजाज खान यांनाच चांगले दाखवतात. ते घरात चुकीचे वागतात, यावर चर्चा कधीच केली जात नाही. असा आरोप कविता कौशिकने बिग बॉसवर केले होते.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात पवित्रा पुनियाच्या एकतर्फी प्रेमाची चर्चा!

Bigg Boss 14 | जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात वाजले ‘झिंगाट’ गाणे!

Bigg Boss | ‘बिग बॉस’कडून भेदभाव, रुबिना दिलैकचे गंभीर आरोप!

(Jasmin Bhasin saves from nomination process in bigg boss house)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.