Casting Couch: ‘ती आपली वैयक्तिक निवड आहे, म्हणून…’, कास्टिंग काऊचबद्दल टीव्ही अभिनेत्रीचा मोठा खुलासा

कास्टिंग काऊचमुळे अनेक अभिनेत्रींनी सोडलं अभिनय क्षेत्र; पण 'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री थेट म्हणाली, 'ती आपली वैयक्तिक निवड आहे...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Casting Couch: 'ती आपली वैयक्तिक निवड आहे, म्हणून...', कास्टिंग काऊचबद्दल टीव्ही अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 1:11 PM

मुंबई : कास्टिंग काऊच म्हणजे झगमगत्या विश्वातील काळं सत्य… चांगली ऑफर देण्याच्या बहाण्याने अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रींसमोर कास्टिंग काऊच सारखी मागणी केली. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर आलेला कास्टिंग काऊचचा प्रसंग सांगितला आहे. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रालाच राम-राम ठोकला. तर काही अभिनेत्रींनी मात्र मेहनत आणि जिद्दीवर झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम अभिनेत्री मोना सिंग हिने तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेवरून मौन सोडलं आहे.

मोना सिंग कास्टिंग काऊचबद्दल म्हणाली, ‘मी देखील कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ मालिका मिळण्याआधी मी ऑडिशनसाठी पुण्यातून मुंबईत यायची. तेव्हा अशा काही लोकांना भेटली, ज्यांना भेटून मला प्रचंड भीती वाटली. काय करु मला काहीही कळत नव्हतं..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘स्त्रिया कितीही भोळ्या असल्या, कोणत्याही वयाच्या असल्यातरी अशा प्रसंगी त्यांच्या मनात आलेली भीती कधीच चुकीची नसते. मी कधीही गैरसमज करत नाही. तेव्हा मी  खूप वाईट परिस्थितीत होती एवढंच मला माहिती होतं आणि मला तेथून पळ काढायचा होता…’ (mona singh on Casting Couch)

हे सुद्धा वाचा

मोना सिंग हिच्या मते कास्टिंग काऊच सारखी गोष्ट फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, अन्य इंडस्ट्रीमध्ये आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. पण अशा गोष्टींमुळे मी स्वप्न पाहणं सोडलं नाही. मला इंडस्ट्रीमध्ये येण्यापासून कोणी थांबवलं नव्हतं. मी आजही माझ्या स्वप्नांच्या मागे धावत आहे. कास्टिंग काऊच सारखी गोष्ट अन्य क्षेत्रात देखील आहे. पण ती आता प्रत्येकाची वैयक्तिक निवड झाली आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

‘जस्सी जैसी कोई नहीं’ मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेल्या मोना सिंग हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एवढंच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीचा बोलबाला आहे. मोनाने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.