Javed Akhtar | रस्त्यावर नमाज पठण करणं योग्य की अयोग्य? जावेद अख्तर यांचं लक्षवेधी वक्तव्य
Javed Akhtar | रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या मुस्लिम बंधवांबद्दल जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य... सरकारचा उल्लेख करत म्हणाले..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची चर्चा... कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात जावेद अख्तर... आता असं म्हणाले तरी काय?
मुंबई | 20 मार्च 2024 : बॉलिवूडचे दिग्गज गीतकार आणि लेखक कायम त्यांच्या कामामुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ज्यामुळे त्यांना अनेक वादग्रस्त परिस्थितीचा देखील सामना करावा लागतो. आता जावेद अख्तर यांनी रस्त्यावर नमाज पठण करणं योग्य की अयोग्य यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच झालेल्या अका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी अनेक मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावर नमाज करणाऱ्या मुस्लिम बंधवांना एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण करत रस्ता मोकळा केला होता. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला. त्याच घडलेल्या घटनेबद्दल जावेद अख्तर यांना नुकताच झालेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं.
घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देत जावेद अख्तर म्हणाले, ‘रस्त्यावर नमाज पठण करणं योग्य नाही. जर नमाज पठण करण्यासाठी जागा नसेल तर, सरकारकडून नमाज पठण करण्यासाठी वेगळी जागा मागा.. हिंदू बंधवांनी केलं मुस्लिम बांधवांनी असं होता कामा नये… पण पोलिसांनी तेव्हा जो मार्ग अवलंबला होता तो देखील चुकीचा होता…’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले. सध्या जावेद अख्तर त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.
सांगायचं झालं तर, जावेद अख्तर यांनी आतापर्यंत अनेक अशा गोष्टींवर स्वतःच मत मांडलं आहे. ज्या समाज आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींवर आधारलेल्या आहेत. जावेद अख्तर कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही बेधडक वक्तव्यांमुळे त्यांनी वादग्रस्त परिस्थितीचा देखील समना करावा लागला आहे.
एवढंच नाहीतर, जावेद अख्तर त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अख्तर यांचा बॉलिवूडमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. जावेद अख्तर यांनी अनेक सिनेमांमध्ये गीतकार म्हणून महत्त्वाची भूमीका साकारली आहे. जावेद अख्तर फक्त त्यांच्या बॉलिवूडमधील योगदानामुळे नाही तर, अनेक मुद्द्यांवर मांडत असलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे देखील चर्चेत असतात.