मुंबई : राज ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कामध्ये दीपोत्सवाचा सोहळा आयोजित केला. यावेळी जावेद अख्तर आणि सलीम खान उपस्थित होते. जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी थेट काही मोठे खुलासे केले. जावेद अख्तर यांनी थेट मनसेच्या मंचावर जय सियारामचा तीन वेळा नारा दिला. भेटल्यानंतर गुड मार्निंगपेक्षा सर्वांनी जय सियाराम म्हणायचे असे सांगताना देखील जावेद अख्तर दिसले. जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या जोडीने तब्बल 25 चित्रपट एकसोबत केले असून त्यापैकी 22 चित्रपट सुपरहिट ठरले.
सलीम खान आणि जावेद अख्तर यांची मुलाखत घेण्यासाठी थेट बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा पोहचला. यावेळी रितेश देशमुख याने असंख्य प्रश्न सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या जोडीला केले. तुमच्या एका चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केल्याचे रितेश देशमुख याने म्हणताच जावेद अख्तर यांनी थेट रितेश देशमुख याला थांबले.
जावेद अख्तर थेट म्हणाले की, असे काही म्हणून नकोस…आमच्या दोघांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावण्याचा विचार आहे का? आमच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होईल. नक्कीच याचा असे काही बोलून तोच विचार दिसत आहे. विशेष म्हणजे जावेद अख्तर यांना यावेळी सलीम खान हे देखील साथ देताना दिसले.
यावेळी उपस्थित लोक हसताना दिसत आहेत. रितेश देशमुख याने स्पष्ट केले की, अजिबात माझा तसा विचार नाहीये. यावेळी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याकडून मोठे खुलासे करण्यात आले. इतकेच नाही तर जावेद अख्तर याच्याकडून थेट ओटीटीचे काैतुक करण्यात आले. सर्व अभिनेत्याचे आणि अभिनेत्रींचे काैतुक देखील यावेळी केले गेले.
जावेद अख्तर म्हणाले की, आताचे चित्रपट बऱ्याच वेळा एकट्याला बघावे लागतात, आमच्या वेळी असे अजिबात नव्हते. सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत बसून चित्रपट बघू शकत होते. यावेळी जावेद अख्तर हे मुलांचे काैतुक करताना देखील दिसले. जावेद अख्तर यांनी यावेळी थेट त्याच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल देखील मोठा खुलासा केलाय. आता जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या या मुलाखतीची चर्चा ही जोरदार होताना दिसत आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी देखील या जोडीला थेट जंजीर चित्रपटाबद्दल काही प्रश्न केले. जंजीर या चित्रपटात जावेद अख्तर आणि अलीम खान यांची जोडी धमाका करताना दिसली. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाबद्दल बोलताना जावेद अख्तर यांनी प्रकाश मेहरा यांचे देखील काैतुक केले. अमिताभ बच्चन हे जंजीर चित्रपटात धमाका करताना दिसले आहेत.