जर मी नशा केली नसती..; पहिल्या लग्नाविषयी जावेद अख्तर यांच्याकडून खंत व्यक्त

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या लग्नाविषयी व्यक्त झाले. जावेद यांनी हनी इरानी यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. या मुलाखतीत अख्तर यांनी पहिल्या लग्नाविषयीची खंत व्यक्त केली.

जर मी नशा केली नसती..; पहिल्या लग्नाविषयी जावेद अख्तर यांच्याकडून खंत व्यक्त
Javed AkhtarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 8:18 AM

मुंबई : 20 मार्च 2024 | गीतकार आणि लेखक जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतात. जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी लग्न केलं. मात्र शबाना या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. जावेद यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इरानी आहे. या दोघांनी 1972 मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर जावेद यांनी शबाना यांच्याशी दुसरं लग्न केलं. आता जवळपास 40 वर्षांनंतर जावेद अख्तर त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पहिला संसार मोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

जावेद अख्तर यांची खंत

जावेद अख्तर म्हणाले की त्यांना दारूचं खूप वाईट व्यसन होतं आणि याच कारणामुळे हनी इरानीसोबतचं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. “मला खात्री आहे की जर मला दारूचं व्यसन नसतं आणि जर मी आणखी जबाबदार असतो, तर कहाणी थोडी वेगळी असती”, अशी खंत अख्तर यांनी व्यक्त केली. हनी इरानी यांच्याशी बऱ्याच काळापूर्वी घटस्फोट झाला असला तरी आजरी त्यांच्याशी चांगली मैत्री असल्याचंही अख्तर यांनी सांगितलं. “माझी पहिली पत्नी हनी इरानी एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे आणि आजही मी तिचा तितकाच आदर करतो. ती माझी आजही सर्वांत चांगली मैत्रीण आहे”, असं अख्तर म्हणाले.

शबाना आझमींनी कसं डील केलं?

या मुलाखतीत जेव्हा जावेद अख्तर यांना विचारण्यात आलं की शबाना आझमी यांनी तुमच्या दारूच्या व्यसनाशी कसं डील केलं, तेव्हा ते पुढे म्हणाले, “सुरुवातीची दहा वर्षे तिने सांभाळून घेतलं. मात्र नंतर तिने दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तीशीच लग्न केलं (हसतात). लग्नाच्या काही काळानंतर मी दारूचं व्यसन सोडलं आणि पुन्हा कधीच त्याच्या वाटेला गेलो नाही.”

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये लग्नगाठ बांधली. पती जावेद अख्तर यांच्यासोबतच्या नात्याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणाल्या, “जावेद आणि मी खूप भांडतो. कधी कधी वाद इतके टोकाला जातात की आम्हाला एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो. पण दिवसाअखेर एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. आमचं नातं असंच आहे. आमचा दृष्टीकोन इतका समान आहे की आम्हाला अरेंज्ड मॅरेज करायला पाहिजे होतं.”

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.