जावेद अख्तर यांच्यावर भडकली कंगना, म्हणाली…

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

जावेद अख्तर यांच्यावर भडकली कंगना, म्हणाली...
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 6:42 PM

मुंबई : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. कंगनाने विविध मुलाखतीत त्यांची बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स पाठवला आहे. कंगनाला 22 जानेवारीला पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. आता या सर्व प्रकरणावर कंगना रनौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज परत एक समन्स आला आहे. तुम्ही मला तुरूंगात टाका आणि माझा छळ करा तरीही मी संघर्ष करेल, पाहिजे तर माझ्यावर 500 गुन्हे दाखल करा (Javed Akhtar vs Kangana Ranaut)

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल.

ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती. कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले होते. कंगना रनौतच्याविरोधात जावेद अख्तरने अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

आई बनल्यानंतर प्रथमच घराबाहेर पडली अनुष्का, सोबत लेकही…

Breaking News | मिर्झापूरचे दिग्दर्शक आणि OTT विरोधात सुप्रीम कोर्टाने काढली नोटीस, पाहा काय कारण!

कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स

(Javed Akhtar vs Kangana Ranaut)

आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.