Jawan मधल्या कावेरी अम्मावरून भन्नाट मीम्स व्हायरल; अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा शाहरुख मला आई म्हणाला..”
शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातील कावेरी अम्माच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री रिधी डोग्राने ही भूमिका साकारली असून तिच्यात आणि शाहरुखच्या वयात फार अंतर आहे.
मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अवघ्या दोन दिवसांत ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर 127.50 कोटी रुपयांची कमाई केली. अटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. शाहरुख खानसोबतच या चित्रपटातील इतरही कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे रिधी डोग्रा. तिने ‘असूर’ आणि ‘बदतमीज दिल’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलंय. रिधी डोग्राने ‘जवान’ चित्रपटात चक्क शाहरुखच्या आईची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेचं नाव चित्रपटात ‘कावेरी अम्मा’ असं आहे.
जवान चित्रपटात रिधीने आझाद म्हणजेच शाहरुखच्या आईची भूमिका साकारली आहे. तिच्या कावेरी अम्मा या भूमिकेवरून सोशल मीडियावर भन्नाट मीन्स व्हायरल होत आहेत. या मीम्सवर आता रिधीने प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ या चित्रपटातही कावेरी अम्माची भूमिका होती. अभिनेत्री किशोरी बल्लाळच्या भूमिकेची तुलना रिद्धी डोग्राशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शाहरुख आणि रिधीच्या वयात फार अंतर आहे. 38 वर्षीय रिधी डोग्राने 58 वर्षीय शाहरुखच्या आईची भूमिका साकारली आहे.
Such a beautiful #kaveriAmma 😘😘😍 @iRidhiDogra .. #Jawan2 me Kaveri ❤️ Vikram Rathore 🔥 #jawan #JawanDay pic.twitter.com/YJR5uNG7cy
— Shahrukh Shaikh (@Jawan_Shahrukh) September 7, 2023
And I cried in my heart 😂 https://t.co/InTSDsQQ0w
— Ridhi Dogra (@iRidhiDogra) September 8, 2023
And I cried in my heart 😂 https://t.co/InTSDsQQ0w
— Ridhi Dogra (@iRidhiDogra) September 8, 2023
‘स्वदेस’मधील कावेरी अम्मा आणि ‘जवान’मधील कावेरी अम्मा या दोघांचे फोटो कोलाज करून भन्नाट मीम बनवण्यात आला आहे. त्यावर रिधीने प्रतिक्रिया दिली आहे. ‘हाहाहाहाहा… कृपया हे थांबवा..’ असं लिहित तिने पुढे हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. जवान पाहिल्यानंतर एका युजरने ट्विटरवर लिहिलं, ‘जेव्हा शाहरुखने तुला चित्रपटात कावेरी अम्मा म्हणून हाक मारली, तेव्हा खरंच मी थिएटरमध्ये उत्साहात ओरडले.’ त्यावर प्रतिक्रिया देताना रिधीने लिहिलं, ‘शूटिंग दरम्यान शाहरुखने जेव्हा मला कावेरी अम्मा म्हणून हाक मारली, तेव्हा तर मी खूप भावूक झाले होते. मनातल्या मनातच मी रडत होते.’
रिधी आणि शाहरुखच्या वयात जवळपास 20 वर्षांचं अंतर आहे. याआधी आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात अभिनेत्री मोना सिंगने आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी आमिर 58 आणि मोना 41 वर्षांची होती. या दोघांमध्येही जवळपास 17 वर्षांचं अंतर होतं. तेव्हासुद्धा नेटकऱ्यांनी मोनाच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केला होता.