Jawan सिनेमाचं तगडं बजेट; शाहरुख खान, दीपिका पादुकोण यांच्या फीचा आकडा थक्क करणारा

| Updated on: Sep 08, 2023 | 8:20 AM

Jawan | एका सिनेमातून सेलिब्रिटी कमावतात कोट्यवधी रुपये, 'जवान' सिनेमाचं बजेट आणि स्टारकास्टचं मानधन ऐकून व्हाल अवाक्, शाहरुख खान याची कमाई म्हणजे...

Jawan सिनेमाचं तगडं बजेट; शाहरुख खान, दीपिका पादुकोण यांच्या फीचा आकडा थक्क करणारा
Follow us on

मुंबई : 8 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण ‘झिरो’ सिनेमानंतर चार वर्ष किंग खान बॉलिवूडपासून दूर होता. पण 2023 किंग खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास ठरला आहे. कारण वर्षाच्या सुरुवातील अभिनेता ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला आणि किंग खान याने पुन्हा चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात विक्रम रचला. आता शाहरुख ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेले ‘जवान’ सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

सिनेमात किंग खान याच्यासोबतच अनेक सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे सिनेमा उत्तम असेल यात काही शंका नाही. सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता येत्या दिवसांमध्ये ‘जवान’ किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या ‘जवान’ सिनेमाचं बजेट आणि स्टारकास्टचं मानधन किती असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर जाणून घेवू सिनेमाचं बजेट आणि सेलिब्रिटींच्या मानधनाबाबत…

‘जवान’ सिनेमाचं बजेट

‘जवान’ सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिका साकारत आहे. ‘जवान’ सिनेमा मल्टीस्टारर फिल्म आहे. ‘जवान’ सिनेमात प्रसिद्ध अभिनेत्री आणि दाक्षिाणात्य अभिनेता आहे. मिळालेल्या माहितीनुसार 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सिनेमा साकारण्यात आला आहे. ‘जवान’ सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे.

अभिनेता शाहरुख खान

शाहरुख खान सिनेमात मुख्य भूमिका साकारत असल्यामुळे किंग खान याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी करत आहेत. सिनेमासाठी किंग खान याने 100 कोटी मानधन घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या कमाईतील 60 टक्के भाग किंग खान याचा असणार आहे.

सिनेमात अभिनेत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे. यासाठी दीपिका हिने 15 – 30 कोटी रुपयांमध्ये मानधन घेतलं आहे. ‘जवान’ सिनेमात अभिनेत्री नयनतारा देखील आहे. ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ज्यासाठी अभिनेत्रीने 10 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याची चर्चा रंगत आहे.

अभिनेता विजय सेतुपती देखील सिनेमात मुख्य भूमिकेत दिसत आहे. रिपोर्टनुसार सिनेमात अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यासाठी अभिनेत्याने 21 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तर अभिनेत्री प्रियामणी हिने 2 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.