Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jawan trailer | ‘बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से..’, शाहरुखचा डायलॉग ऐकून चाहत्यांना आठवले समीर वानखेडे

शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुखने सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला असून त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.

Jawan trailer | 'बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से..', शाहरुखचा डायलॉग ऐकून चाहत्यांना आठवले समीर वानखेडे
Jawan trailer Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 2:14 PM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. जवळपास दोन मिनिटं 45 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्सचा भरणा पहायला मिळतोय. त्याचसोबत कलाकारांची मोठी फौजसुद्धा यात दिसतेय. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत साऊथ स्टार विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा ‘जवान’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये ती काही ॲक्शन सीन्ससुद्धा करताना दिसतेय.

जवान या चित्रपटातील लूकसाठी शाहरुख खानने फार मेहनत घेतली आहे. तो पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. हे पाचही लूक या ट्रेलरमध्ये पहायला मिळतात. ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ या संवादाने कथेची उत्सुकता आणखी वाढवली आहे. कारण शाहरुखच पिता-पुत्राच्या भूमिकेत असेल का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अटली या दाक्षिणात्य दिग्दर्शकाने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

या ट्रेलरमध्ये एकीकडे शाहरुखने मेट्रो हायजॅक केल्याचं दाखवलं आहे, तर दुसरीकडे नयनतारा पोलीस अधिकारीच्या भूमिकेत आहे. तिच्या हातात हायजॅकची केस सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये आलिया भट्टशी संबंधित मजेशीर डायलॉगसुद्धा आहे. तर आणखी एका सीनमध्ये शाहरुख एका सैनिकाच्या भूमिकेत पहायला मिळतोय. तर विजय सेतुपती हा खलनायक साकारतोय. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिधी डोग्रा, सुनील ग्रोवर यांसारख्या इतर कलाकारांचीही झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळतेय.

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे ‘जवान’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अटलीने हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आहे. जवान या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खान आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

‘जवान’ या चित्रपटाशिवाय शाहरुखच्या ‘डंकी’चीही प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुखसोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी काम करत आहेत. हा चित्रपट ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.