मुंबई | 26 जुलै 2023 : आतापर्यंत अभिनेत्री जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे जया बच्चन चर्चेत आल्या. आता देखील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जया बच्चन भडकलेल्या दिसत आहेत. जया बच्चन यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यानचा आहे. ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचलेल्या जया बच्चन मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा हिची प्रतीक्षा करत होत्या..
जया बच्चन यांना पाहिल्यानंतर पापाराझींनी त्यांना फोटोसाठी पोज देण्यासाठी विनंती केली. पापाराझींचा आरडा – ओरडा ऐकून जया बच्चन भडकल्या आणि म्हणाल्या, ‘बहरी नही हूं, चिल्लाओ मत.. आराम से बोलो…’ सध्या जया बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर काही नेटकरी कमेंटच्या माध्यमातून जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत.
अभिनेत्री जया बच्चन (Jaya bachchan) कायम त्यांच्या कठोर स्वभावामुळे ओळखल्या जातात. जया बच्चन यांना परवानगी घेतल्याशिवाय फोटो काढणं बिलकूल आवडत नाही. जया यांना न सांगता फोटो काढल्यामुळे त्या अनेकदा फोटोग्राफर्सवर संतापल्या. आता देखील असंच काही झालं आहे. सध्या जया बच्चन व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे तर चर्चेत आहेतच पण ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमामुळे देखील जया बच्चन चर्चेत आहेत.
जया बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं, अनेक वर्षांपासून त्या बॉलिवूडपासून दूर आहेत. पण ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका असणार आहे. एक काळ होता जेव्हा जया बच्चन यांचा बॉलिवूडमध्ये बोलबाला होता. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कि एंड का’ सिनेमात जया बच्चन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसल्या होत्या. आता चाहते देखील त्यांच्या नव्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमा २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात जया बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची कथा एका प्रेमकथे भोवती फिरताना दिसत आहे. सिनेमात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमात जया बच्चन, आलिया भट्ट, रणवीर सिंग यांच्यासोबतच अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक करण जोहर याने केलं आहे. सिनेमाच्या माध्यमातून करण तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा पदार्पण करत आहे.