Aishwarya Rai : ‘जुन्या विचारांची सासू’, कसं आहे जया बच्चन – ऐश्वर्या राय यांचं नातं?

Aishwarya Rai : सून ऐश्वर्या राय हिच्याबद्दल असं काय म्हणाल्या जया बच्चन? बच्चन कुटुंबियांना कायम ऐश्वर्या हिच्याबद्दल विचारण्यात येतं... आता जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सर्वत्र फक्त ऐश्वर्या राय आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Aishwarya Rai : 'जुन्या विचारांची सासू', कसं आहे जया बच्चन - ऐश्वर्या राय यांचं नातं?
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 12:54 PM

मुंबई : 1 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर अनेकदा ऐश्वर्या हिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं. फक्त ऐश्वर्या राय हिलाच नाही तर, बच्चन कुटुंबियांना देखील ऐश्वर्या हिच्याबद्दल विचारण्यात आलं. दरम्यान, ऐश्वर्या आणि सासूबाई जया बच्चन यांचं नातं कसं आहे? असा प्रश्न सतत विचारण्यात येत होता. जया बच्चन कायम कोणत्याही ठिकाणी रागात आणि संतापलेल्या दिसतात, म्हणून ऐश्वर्या राय हिच्यासोबत देखील जया बच्चन यांचं खटकत असेल… असा देखील अनेकांचा समज होता…

सध्या जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ जया बच्चन सून ऐश्वर्या हिच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शेमध्ये जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या राय हिच्याबद्दल जया बच्चन म्हणाल्या, ‘ऐश्वर्या स्वतः फार मोठी स्टार आहे. पण जेव्हा पूर्ण कुटुंब एकत्र असतं, तेव्हा ऐश्वर्या कधी पुढे-पुढे करत नाही. तिच्यातील ही क्वालिटी मला फार आवडते. तिचा स्वभाव शांत आहे. ती गोष्टी समजून घेते. ती उत्तम प्रकारे प्रत्येक वातावरणात स्वतःला सामावून घेते..’

पुढे जया बच्चन म्हणाल्या, ‘ऐश्वर्या हिला कळतं एक कुटुंब आहे. कुटुंबाचे चांगले मित्र आहेत… आणि सगळंकाही असंच असायला हवं. मला वाटतं ऐश्वर्या तिचं प्रत्येक कर्तव्य उत्तम रित्या पार पाडते…’ सध्या सर्वत्र जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.. पण जया बच्चन यांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत.

एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘जुन्या विचारांची सासू…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आज देखील बेधडक बोलणाऱ्या महिलांना कोणी स्वीकारत नाही…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘इतके श्रीमंत असूनही असे विचार…’, सर्वत्र जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.