सून ऐश्वर्या राय हिच्यासाठी जया बच्चन यांनी ठरवून दिलेले नियम! जाणून व्हाल हैराण

jaya bachchan on aishwarya rai : सून ऐश्वर्या राय हिच्यासाठी जया बच्चन यांनी ठरवून दिलेल्या नियमांवर अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य.. चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा...

सून ऐश्वर्या राय हिच्यासाठी जया बच्चन यांनी ठरवून दिलेले नियम! जाणून व्हाल हैराण
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 10:22 AM

मुंबई | 22 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. ऐश्वर्या हिला लेकीसोबत कायम स्पॉट केलं जातं. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. यासाठी जया बच्चन यांना देखील जबाबदार धरलं जात आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झाल्यानंतर जया बच्चन यांनी सूनेला काही नियम ठरवून दिले होते. ज्याची चर्चा सध्या तुफान रंगली आहे.

जया बच्चन यांनी अनेक मुलाखतींमध्ये ऐश्वर्या राय हिच्याबद्दल सांगितलं आहे. जया बच्चन म्हणाल्या होत्या, ऐश्वर्या हिला कोणती गोष्ट आवडली नाही किंवा तिला एखादी गोष्ट खटकत असले, तर तिने स्पष्ट बोलावं… अशी अपेक्षा जया बच्चन यांना सूनेकडून आहे. शिवाय ऐश्वर्या हिने कुटुंबातील सर्वांचा आदर, सन्मान करावा…

एका मुलाखतीत जया बच्चन यांनी ऐश्वर्या हिची आवडणारी एक सवय सांगितली बोती. ‘ऐश्वर्या हिची एक सवय मला प्रचंड आवडते. सर्वांसमोर ती काहीही बोलत नाही. ती शांत उभी राहते आणि ऐकते…’ या वक्तव्यानंतर जया बच्चन यांना ट्रोल करण्यात आलं होतं. जया बच्चन यांना ‘जुन्या विचारांची सासू…’ असं नेटकरी म्हणाले होते.

जया बच्चन यांनी ठरवून दिलेल्या नियमांबद्दल अभिषेक बच्चन याने देखील मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेता म्हणाला होता, ‘आईने एक नियम मुलगा आणि सूनेसाठी  ठरवून दिला. एक वेळचं जेवण सर्वांनी एकत्र करायलाच हवं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. बच्चन कुटुंबातील काही अशा गोष्टी समोर आल्या ज्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल ज्या चर्चा रंगत आहेत, त्यावर बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या – अभिषेक यांनी मौन बाळगलं आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.