अखेर ‘त्या’ वाईट काळाबद्दल बोलताना दिसल्या जया बच्चन, म्हणाल्या, परिस्थिती ही..

Jaya Bachchan : बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नुकताच आता जया बच्चन यांनी मोठा खुलासा केलाय. पहिल्यांदाच पर्सनल लाईफबद्दल बोलताना जया बच्चन दिसल्या.

अखेर 'त्या' वाईट काळाबद्दल बोलताना दिसल्या जया बच्चन, म्हणाल्या, परिस्थिती ही..
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 1:13 PM

मुंबई : अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतात. अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना देखील दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अमिताभ बच्चन हे अंबानींच्या पार्टीत धमाल करताना दिसले.

गेल्या काही दिवसांपासून जया बच्चन या नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये मोठे खुलासे करताना दिसत आहेत. नुकताच नव्याच्या शोमध्ये जया बच्चन आणि श्वेता बच्चन या पोहचल्या होत्या. यावेळी नव्या ही अमिताभ बच्चन यांच्या वाईट काळाबद्दल जया बच्चन यांना विचारताना दिसली. पहिल्यांदाच त्याबद्दल असे जाहिर बोलताना जया बच्चन या दिसल्या आहेत.

नव्या म्हणाली की, ज्यावेळी नाना एका वाईट काळातून जात होते, त्यावेळी तुम्ही या गोष्टी कशापद्धतीने हाताळल्या. यावर जया बच्चन या म्हणाल्या की, आयुष्यात बऱ्याच वेळा चढउतार बघायला मिळाले. मात्र, त्यावेळी आम्ही दोघांनी मिळून परिस्थितीत हाताळली. जया बच्चन पुढे म्हणाल्या, मुळात म्हणजे मला नाही माहिती की, मी चुकीचे केले की, बरोबर.

जर एखादा व्यक्ती त्याच्या वाईट काळातून जात असेल तर त्याच्यासोबत उभे राहिला पाहिजे आणि शांतीने त्याची साथ द्यावी. या परिस्थितीमध्ये तुम्ही चिडचिड करणे योग्य नाही. जर तुम्ही चिडचिड करत बसाल तर समस्या वाढू शकतात. जर त्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज असेल तर तो व्यक्ती तुम्हाला विचारेल. मात्र, श्वेता बच्चन ही जया बच्चन यांच्या या गोष्टींबद्दल सहमत दिसली नाही.

अमिताभ बच्चन यांच्यावर तब्बल 90 कोटींचे कर्ज हे झाले होते. त्यादरम्यान अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसले. त्यानंतर 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांना काैन बनेंगा करोडपती या शोची आॅफर आली. पहिल्यांदाच या वाईट काळाबद्दल असे जाहिरपणे बोलताना जया बच्चन या दिसल्या आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.