ऐश्वर्या रायवर जया बच्चन नाराज, सूनेच्या वाईट सवयीबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, ती कधीच कोणाचा..
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सतत विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर यांच्या घटस्फोट होणार असल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. नुकताच आता जया बच्चन यांच्याकडून खुलासा करण्यात आलाय.
मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर यांचा घटस्फोट होणार असल्याचे देखील सांगितले जाते. मात्र, बच्चन कुटुंबियापैकी कोणीही यावर काहीही भाष्य करताना दिसत नाहीये. आता पहिल्यांदाच ऐश्वर्या राय हिच्याबद्दल जाहिरपणे बोलताना जया बच्चन या दिसल्या आहेत. आता जया बच्चन यांच्या विधानाची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे. जया बच्चन यांचे हे बोलून ऐकून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे देखील बघायला मिळतंय.
नुकताच जया बच्चन या नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये पोहचल्या होत्या. यावेळी काही मोठे खुलासे हे जया बच्चन यांच्याकडून करण्यात आले. थेट ऐश्वर्या राय हिच्याबद्दल बोलताना जया बच्चन दिसल्या. जया बच्चन या म्हणाल्या की, माझी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठी तक्रार आहे. थेट जाहिरपणे जया बच्चन या ऐश्वर्या राय हिची तक्रार करताना दिसल्या.
जया बच्चन या म्हणाल्या की, ऐश्वर्या कधीच फोन उचलत नाही, हेच नाही तर ती साधा मेसेजला उत्तर देखील देत नाही. मला ऐश्वर्याची ही गोष्ट अजिबातच आवडत नसल्याचे सांगताना जया बच्चन या दिसल्या. बऱ्याच गोष्टी जया बच्चन या ऐश्वर्याचे नाव न घेता देखील बोलल्या. जया बच्चन थेट म्हणाल्या की, नेहमीच नात्यांचा सन्मान करायला हवा.
बऱ्याच वेळा तू करून बोलले जाते, जे मला अजिबातच आवडत नाही. मी आजही आमिताभ बच्चन यांना जी म्हणून बोलते. परंतू आजकाल असे अजिबातच राहिले नाहीये. थेट पतीला तू वगैरे करून बोलले जाते. यावेळी जया बच्चन यांनी ऐश्वर्याचे नाव घेतले नाही. मात्र, जया बच्चन हे सर्व ऐश्वर्या राय हिलाच बोलल्या असल्याचे सांगितले जाते.
ऐश्वर्या राय हिच्या थेट काही वाईट सवयींबद्दल बोलताना जया बच्चन या दिसल्या. यामुळेच जया बच्चन या ऐश्वर्या राय हिच्यावर नाराज असल्याचे देखील सांगितले जाते. जया बच्चन या कायमच त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच आता जया बच्चन यांचे हे विधान ऐकून चाहते हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.