Bollywood : जया बच्चन यांच्यामुळे उद्ध्वस्त झाला कपूर कुटुंबाच्या लेकीचा संसार!

Bollywood : जया बच्चन यांच्या एका अटीमुळे उद्ध्वस्त झाला कपूर कुटुंबाच्या लेकीचा संसार! तेव्हा नक्की झालं तरी काय होतं. त्यानंतर कपूर कुटुंबाच्या लेकीच्या आयुष्यात आल्या अनेक अडचणी... सध्या सर्वत्र बच्चन आणि कपूर कुटुंबाची चर्चा...

Bollywood : जया बच्चन यांच्यामुळे उद्ध्वस्त झाला कपूर कुटुंबाच्या लेकीचा संसार!
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 1:38 PM

मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन कायम त्यांच्या स्वभावामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील तुफान व्हायरल होत असतात. एक काळ असा होता, जेव्हा कपूर कुटुंबातील मुलीचा साखरपुडा मोडल्यामुळे जया बच्चन चर्चेत आल्या होत्या. बच्चन कुटुंबाचा मुलगा अभिषेक बच्चन आणि कपूर कुटुंबाची लेक करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. खुद्द जया बच्चन यांनी करिश्मा कपूर हिला सून म्हणून घोषित केलं होतं. पण साखरपुडा होवून करिश्मा आणि अभिषेक यांचे मार्ग वेगळे झाले. आज दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे गेले आहेत. पण तरी देखील त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगलेल्या असतात.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा झाला होता. साखपुड्यानंतर दोघांच्या लग्नाची इंडस्ट्रीमधील प्रत्येकाला प्रतीक्षा होती. कारण बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध कुटुंब एका खास नात्यात बांधली जाणार होती. पण तसं काही झालं नाही. नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचल्यानंतर करिश्मा आणि अभिषेक यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर हिची आई बबिता कपूर यांनी बच्चन कुटुंबियांपुढे काही अटी ठेवल्या. त्यामधील एक अट म्हणजे बच्चन कुटुंबाने लग्नाआधी संपत्तीचा काही भाग अभिषेक याच्या नावावर करायचा… बच्चन कुटुंबीयांनी बबिता यांच्या अटीवर आक्षेप घेतला, असं सांगण्यात येतं. बबिता यांच्या अटीमुळे बच्चन आणि कपूर कुटुंबातील नात्यात दुरावा निर्माण झाला होता. परिणामी करिश्मा आणि अभिषेत यांना विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला.

हे सुद्धा वाचा

फक्त बबिता कपूर यांनीच नाही तर, जया बच्चन यांनी देखील करिश्मा हिच्या पुढे एक घट घातली होती. लग्नानंतर करिश्मा सिनेमांमध्ये काम करणार नाही… अशी जया बच्चन यांनी अट होती. रिपोर्टनुसार, करिश्मा आणि तिच्या आईला ही अट मान्य नव्हती. ज्यामुळे करिश्मा – अभिषेक यांचं चं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही..

अभिषेक याच्यासोबत साखरपुडा तुटल्यानंतर करिश्मा कपूर हिने श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. करिश्मा – संजय यांनी घटस्फोटादरम्यान एकमेकांवर गंभीर आरोप केलं. करिश्मा संजय याची दुसरी पत्नी होती. आज अभिनेत्री दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

तर अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.