श्वेता बच्चन हिची बरोबरी अभिषेक कधीच करु शकत नाही! जया बच्चन यांचं स्पष्ट वक्तव्य

Jaya Bachchan : अभिषेक बच्चन नाही तर, लेक श्वेता बच्चन हिच्यावर जया बच्चन यांचा अधिक विश्वास... अखेर त्यांनी मनातली गोष्ट बोलून दाखवलीच... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन आणि त्यांच्या वक्तव्याची चर्चा...

श्वेता बच्चन हिची बरोबरी अभिषेक कधीच करु शकत नाही!  जया बच्चन यांचं स्पष्ट वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 3:25 PM

मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री जया बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच जया बच्चन यांची नात नव्या नवेली हिचा ‘व्हाट द हेल नव्या -2’ पॉडकास्ट YouTube चॅनलवर स्ट्रीम झाला आहे. शोचा पहिला एपिसोड दमदार होता. चाहत्यांना देखील नव्या नवेली हिचा शो आवडला. सांगायचं झालं तर, महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातीने पुन्हा तिच्या हटके होस्टींग स्टाईलने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. नव्या हिच्या शोमध्ये आजी जया बच्चन आई आई श्वेता बच्चन नंदा यांच्यामधील जुगलबंदी चाहत्यांना अनुभवता आली. नुकताच समोर आलेल्या शोमध्ये जया बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चन आणि लेक श्वेता बच्चन नंदा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नव्या नंदाने तिच्या चॅनेलवर शोच्या पहिल्या भागाचा ‘हू मेक्स द वर्ल्ड गो राउंड’ नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ज्यामधील नव्या हिचं काम पाहून चाहते खूप खूश आहेत. दरम्यान, नव्याने तिची आई श्वेताला तिच्या सल्ल्याबद्दल प्रश्न विचारला. ती म्हणते आज तू जास्त सल्ला का दिला नाहीस? यावर श्वेता बच्चन म्हणते, ‘कारण तू जे काही बोलत आहेस, त्याबद्दल मला काहीही माहिती नाही…’

पुढे श्वेता म्हणते, ‘सध्या सुरु असलेल्या मुद्द्याबद्दल मला काहीही माहिती नाही. म्हणून मी शांत बसली आहे. याठिकाणी मला मुर्ख बनायचं नाही…’ यावर नव्या म्हणते, ‘असं काहीही नाही, तुझा सल्ला याठिकाणी फार मोलाचा आहे….’ श्वेता आणि नव्या यांच्यामध्ये संवाद सुरु असताना जया बच्चन काहीही बोलत नाहीत, फक्त लेक आणि नातीकडे पाहात राहतात.

हे सुद्धा वाचा

पुढे जया बच्चन लेक श्वेता हिची बाजू घेत म्हणतात, ‘श्वेता माझी ताकद आहे. श्वेता माझ्यासाठी अभिषेक याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. हे असं का आहे मला माहिती नाही. पण ती एक महिला आहे. म्हणून ती माझी शक्ती आहेस…’ जया यांच्या वक्तव्यावर श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा आनंदी होतात आणि म्हणतात, ‘तुम्ही प्रचंड गोड आहात..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा आणि नव्या नवेली नंदा यांची चर्चा रंगली आहे.

श्वेता बच्चन नंदा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्वेता महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मोठी मुलगी आहे. श्वेता बच्चन हिचं लग्न उद्योजक निखिल नंदा यांच्यासोबत झालं आहे. श्वेता आणि निखिल यांना नव्या आणि अगस्त्य नंदा अशी दोन मुलं आहेत. श्वेता बच्चन हिने कधीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. पण श्वेता हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर कायम बच्चन कुटुंबाची चर्चा रंगलेली असते.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.