जया बच्चन थेट ऐश्वर्या रायबद्दल म्हणाल्या, मी तिच्या तोंडावरच..
ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या राय ही घटस्फोट घेणार असल्याचे सतत सांगितले जातंय. या चर्चांमुळे चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. जया बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल अत्यंत मोठे विधान हे केले आहे.
मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये मोठे वाद झाल्याची चर्चा आहे. फक्त हेच नाही तर यांच्या नात्यामध्ये इतका जास्त दुरावा आलाय की, चक्क ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे काही रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे. ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरात शिफ्ट झालीये. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट लवकरच होणार असल्याचे सांगितले जातंय. सततच्या या चर्चांमुळे चाहते हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनी ऐश्वर्या रायबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला.
जया बच्चन यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या मुलाखतीमध्ये जया बच्चन या ऐश्वर्या राय आणि त्यांच्या रिलेशनबद्दल बोलत आहेत. जया बच्चन थेट म्हणाल्या की, मला जर ऐश्वर्या राय हिची एखादी गोष्टी आवडली नाही की, मी थेट तिच्या तोंडावरच बोलून टाकते. मला पाठीमागे राजकारण करायला अजिबातच आवडत नाही.
हेच नाही माझी एखादी गोष्ट जर ऐश्वर्या राय हिला आवडली नाही तर ती देखील मला तोंडावर स्पष्टपणे कायमच बोलत असते. फक्त मी थेट बोलते आणि ती थोडा विचार करते. त्याचे कारणही तसेच आहे. कारण मी तिची सासू आहे. हेच नाही तर मी घरातील मोठी व्यक्ती असल्याने ती थोडा विचार करूनच मला बोलते.
या मुलाखतीमध्ये पुढे जया बच्चन या म्हणाल्या की, मुळात म्हणजे आम्ही दोघी जेंव्हा एकसोबत असतो तेंव्हा नेहमीच धमाल करतो. जया बच्चन थेट म्हणाल्या होत्या की, ती माझी चांगली मैत्रीण आहे. आमचे रिलेशन खूप जास्त छान आहे. 20 एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न झाले. धूमधडाक्यात हे लग्न पार पडले.
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचे रिलेशन अगोदरप्रमाणे राहिले नसल्याचे सांगितले जात आहे. ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जातंय. फक्त जया बच्चन आणि ऐश्वर्या राय नाही तर श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे देखील रिलेशन फार जास्त छान नसल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. आता याबद्दल काय मोठे खुलासे होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय.