Hema Malini : ‘मी सुंदर नाही…’, अमिताभ बच्चन – हेमा मालिनी यांना एकत्र पाहिल्यानंतर असं का म्हणाल्या जया बच्चन?

अमिताभ बच्चन - हेमा मालिनी यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीवर अभिनेत्री जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'मी सुंदर दिसत नाही...', सर्वत्र चर्चांना उधाण

Hema Malini : 'मी सुंदर नाही...', अमिताभ बच्चन - हेमा मालिनी यांना एकत्र पाहिल्यानंतर असं का म्हणाल्या जया बच्चन?
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 3:20 PM

मुंबई | 16 जुलै 2023 :  ८० – ९० च्या दशकातील सेलिब्रिटी आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसले तरी, त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा कायम सर्वत्र रंगलेल्या असतात. आता देखील महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री जया बच्चन आणि हेमा मालिनी यांची चर्चा रंगली आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बागबान’ सिनेमात अमितात्र बच्चन आणि हेमा मालिनी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ऑनस्क्रिन अमिताभ – हेमा यांच्यातील केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली होती. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर देखील घेतलं होतं. सिनेमा प्रदर्शित होवून हीट ठरल्यानंतर अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. जया बच्चन यांनी तेव्हा केलेल्या वक्तव्याची चर्चा आजही चर्चेत आहे.

‘बागबान’ सिनेमा हीट ठरल्यानंतर सर्वत्र अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगत असताना, जया बच्चन यांनी एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. मुलाखतीत होस्टने जया बच्चन यांना विचारलं की, तुम्हाला असं कधी वाटलं नाही ‘बागबान’मध्ये तुमच्या पतीसोबत तुम्ही असायला हव्या होत्या? यावर जया बच्चन यांनी दिलेलं उत्तर आजही चर्चेत आहे.

जया बच्चन म्हणाल्या, ‘नाही मला असं कधीही वाटलं नाही… कारण हेमा यांनी साकारलेली भूमिका उत्तम होती. भूमिकेत जेवढ्या त्या सुंदर दिसत होत्या तेवढी सुंदर मी दिसली नसती…’ सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी देखील ‘बागबान’ सिनेमाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

‘बागबान’ सिनेमाच हेमा मालिनी, अमिताभ बच्चन यांच्यासोबत सलमान खान, महिमा चौधरी, अमन वर्मा आणि समीर सोनी यांसारखे कलाकार होते. १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४३ कोटी रुपयांपेक्षा जास्ट कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता. सिनेमा आजही चाहत्यांचं मनोरंजन करत असतो…

सांगायचं झालं तर, ‘बागबान’ सिनेमात चार मुलांच्या आईच्या भूमिकेसाठी हेमा मालिनी यांनी नकार दिला होता.पण आईच्या हट्टामुळे हेमा मालिनी यांनी ‘बागबान’ सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासाठी होकार दिला. ‘बागबान’ सिनेमावर अभिनेते धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया कशी होती. याबद्दल देखील हेमा मालिनी यांनी सांगितलं.

रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांनी ‘बागबान’ सिनेमा पाहिलेला नाही. अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे त्यांनी चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. असं अनेकदा समोर आलं. पण याबद्दल अद्याप कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.