जेव्हा डॉक्टरांना वाटलं बिग बी वाचणार नाही; हनुमान चालिसा घेवून जया बच्चन रुग्णालयात पोहोचल्या आणि…

अमिताभ बच्चन यांच्या अपघातानंतर जया बच्चन यांना दीराने नेलं रुग्णालयात आणि म्हणाले, 'मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला स्वतःचं मन खंबीर करण्याची गरज आहे...'

जेव्हा डॉक्टरांना वाटलं बिग बी वाचणार नाही;  हनुमान चालिसा घेवून जया बच्चन रुग्णालयात पोहोचल्या आणि...
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 2:08 PM

Amitabh bachchan Injured : अभिनेते अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याची माहिती समोर आली. हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाचं शुटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाल्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. पण याआधी देखील बिग बीचा ॲक्शन सीन शुट करताना अपघाता झाला होता. १९८२ साली जेव्हा ‘कुली’ सिनेमाची शुटिंग सुरु होती, तेव्हा ॲक्शन सीन शुट करताना बिग बींना जखमी झाले होते. तेव्हा अमिताभ बच्चन यांची प्रकृतीमध्ये सुधार होण्यासाठी मोठा काळ लागला.

कुली सिनेमाच्या शुटिंग दरम्यान घडलेल्या या घटनेची माहिती खुद्द बिग बींनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली. शिवाय जया बच्चन यांनी देखील सिमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये बिग बींच्या अपघातानंतर आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. अपघातानंतर बिग बींच्या प्रकृतीबद्दल सांगताना जया बच्चन भावुक झाल्या होत्या.

बिग बींच्या अपघाताबद्दल जया बच्चन म्हणाल्या, ‘जेव्हा मी रुग्णालयात पोहोचली, तेव्हा माझे दीर त्यांनी मला विचारलं इतका वेळ कुठे होता तुम्ही. मी त्यांना सांगितलं मुलांना पाहण्यासाठी घरी गेली होती. त्यानंतर दीर मला म्हणाले, मी आता तुम्हाला जे सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला स्वतःचं मन खंबीर करण्याची गरज आहे…’

हे सुद्धा वाचा

‘जे घडलं होतं त्याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. मला सतत वाटत होतं असं होवूच शकत नाही. माझ्या हातात हनुमान चालिसा होती. तेव्हा डॉक्टर दस्तूर आले आणि मला म्हणाले, आता फक्त आणि फक्त तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. मी तेव्हा पूर्ण घाबरली होती…’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या.

पुढे जया बच्चन म्हणाल्या, ‘माझ्या हातात हनुमान चालिसा होती, पण मी ती वाचू शकत नव्हती. मला काहीही कळत नव्हतं लोक काय करतात. बिग बींचा हार्ट पंप करत आहेत एवढंच मला दिसत होतं. हार्ट पंप.. इंजेक्शन पाहून मला काय करावं कळत नव्हतं. डॉक्टरांनी देखील हार मानली होती. त्यानंतर मी त्यांच्या पायांना हात लावला. तेव्हा त्यांची बोटं मला हलताना दिसली.’

त्यानंतर सिमी यांनी जया बच्चन यांना विचारलं, ‘तेव्हा मानात काय सुरु होतं…’, यावर जया बच्चन म्हणाल्या, ‘काय होवू शकतं याचा विचार करणंच मी बंद केलं होतं. मला विश्वास होते अमिताभ बच्चन आपल्याला निराश करणार नाही…’ तेव्हा बिग बींची प्रकृती खालावली होती. त्यानंतर बिग बींची प्रकृती सुधारली.

दरम्यान, अनेक वर्षांनी पुन्हा शुटिंग दरम्यान अपघात झाल्यानंतर बिग बींच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. खुद्द बिग बींनी त्यांच्या प्रकृतीबद्दल ब्लॉगच्या माध्यमातून माहिती दिली. अनेक वर्ष सिनेमांच्या माध्यामातून चाहत्यांच्या मनार राज्य करणाऱ्या बिग बी साता समुद्रापार देखील प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पण खुद्द बिग बींनी काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.