“मला अशी पत्नी हवी जी..”; लग्नापूर्वी बिग बींची होती मोठी अट, 49 वर्षांनंतर जया यांचा खुलासा

आजोबांनी तुम्हाला प्रपोज कसं केलं? नातीच्या प्रश्नावर जया बच्चन यांचं उत्तर

मला अशी पत्नी हवी जी..; लग्नापूर्वी बिग बींची होती मोठी अट, 49 वर्षांनंतर जया यांचा खुलासा
Amitabh and Jaya BachchanImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 1:00 PM

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या विधानांसाठी चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. बिग बींनी त्यांच्याशी लग्न करण्यापूर्वी एक मोठी अट ठेवली होती, असं जया बच्चन यांनी सांगितलं. अमिताभ आणि जया यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता 49 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा एक पॉडकास्ट शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. याच शोमध्ये जया यांनी हजेरी लावली होती. यावेळी शोमध्ये त्यांनी लग्नाबद्दलचा खुलासा केला. जया बच्चन यांनी सांगितलं की अमिताभ यांनी त्यांच्याशी लग्न करण्यापूर्वी असं सांगितलं होतं की त्यांना 9 ते 5 वेळेदरम्यान काम करणारी पत्नी पाहिजे.

आजोबांनी तुम्हाला प्रपोज कसं केलं होतं, असा प्रश्न नव्याने जया यांना विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं, “मी कोलकातामध्ये शूटिंग करत होती. तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की जर आमचा कोणता चित्रपट हिट झाला, तर आम्ही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जाणार. त्यानंतर जंजीर हा चित्रपट हिट ठरला. मी कोलकातामध्ये शूटिंगसाठी गेली होती, तेव्हा तुझ्या आजोबांनी कॉल करून मला सांगितलं की, एक समस्या आहे.”

हे सुद्धा वाचा

“तुझ्यासोबत बाहेर फिरायला जाण्यासाठी माझ्या पालकांनी नकार दिला आहे. जर तुला जयासोबत फिरायला जायचं असेल तर तिच्याशी लग्न कर, असं ते म्हणाले. तेव्हा त्यांनी (अमिताभ) मला विचारलं की तुझा काय विचार आहे? मी म्हटलं, आपण जर ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा विचार करत होतो, तर जूनमध्येच करू”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

एकत्र फिरायला जाण्यासाठी जया आणि अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या ठरलेल्या तारखेआधीच लग्नगाठ बांधली होती. लग्नापूर्वी बिग बींनी ठेवलेल्या अटीबद्दल सांगताना जया पुढे म्हणाल्या, “ऑक्टोबरपर्यंत माझं काम कमी होईल, या विचाराने आम्ही लग्नाचा महिना तो ठरवला होता. मात्र त्यावर अमिताभजी मला म्हणाले होते की, मला अशी पत्नी पाहिजे, जी 9 ते 5 वेळेदरम्यान काम करेल. तुला दररोज काम करण्याची गरज नाही. तू तुझे प्रोजेक्ट्स, काम योग्य व्यक्तींसोबत केले पाहिजेस.” या अटींना मंजूर केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

अमिताभ बच्चन आणि जया यांनी 1973 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या एक वर्षानंतर जया यांनी श्वेताला जन्म दिला. त्यानंतर 1976 मध्ये अभिषेकचा जन्म झाला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.