सून ऐश्वर्यासाठी जया बच्चन यांना शाहरुख खानच्या का लावायची होती कानशीलात?

शाहरुख खानच्या कानशीलात लावली असती..., सून ऐश्वर्या राय हिची बाजू घेत जया बच्चन यांनी किंग खान बद्दल केलं असं वक्तव्य... शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन कायम कोणत्या न कोणत्याा कारणामुळे असतात चर्चेत...

सून ऐश्वर्यासाठी जया बच्चन यांना शाहरुख खानच्या का लावायची होती कानशीलात?
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 1:33 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाही तर, अभिनय आणि बुद्धिमत्तेमुळे देखील चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय हिचा बोलबाला होता. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत ऐश्वर्या हिने स्क्रिन शेअर केली आहे. ऐश्वर्या हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. पण काही असे सिनेमे देखील आहेत, ज्यातून अभिनेत्रीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शिवाय ते सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर सुपरहीट ठरले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सिनेमांमधून ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्या सिनेमांमध्ये अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. शाहरुख आणि ऐश्वर्या 5 सिनेमांमध्ये एकत्र दिसणार होते. ज्यामध्ये वीर झारा, चलते चलते यांसारखे सुपरहीट सिनेमे होते. सिनेमांसाठी पहिली पसंती ऐश्वर्या राय हिच्या नावाला दिली होती. पण नंतर अभिनेत्रीला बाहेरचा रस्ता दाखवला.

यावर खुद्द शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांनी मुलाखतीत स्वतःचं मत मांडलं होतं. एवढंच नाही तर, किंग खानने माफी देखील मागितली होती. मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला होता, सिनेमांबद्दल सर्व अधिकार एकट्या शाहरुख खान याच्याकडे नव्हते. ऐश्वर्या सिनेमात नाही कळल्यानंतर शाहरुखला देखील मोठा धक्का बसला. कारण तेव्हा दोघांमध्ये चांगली मैत्री होती. यासाठी शाहरुखने खंत देखील व्यक्त केली होती. शाहरुख आणि ऐश्वर्या यांनी देवदास, मोहब्बते, जोश यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली.

ऐश्वर्या राय हिची प्रतिक्रिया…

मुलाखतीत ऐश्वर्या देखील यावर विचारण्यात आलं होतं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘माझी प्रतिष्ठा मला खूप प्रिय आहे. माझा स्वभाव असा नाही की मी जाऊन त्याबद्दल विचारेन. जर एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल सांगायचं असेल तर तो सांगेल, परंतु जर त्याला सांगायचं नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याचा कोणताही हेतू नाही.’ जेव्हा याबद्दल शाहरुख खानला माहिती झालं तेव्हा अभिनेत्याने ऐश्वर्याची माफी देखील मागितली होती.

जया बच्चन यांची प्रतिक्रिया

2008 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख सिनेमांमधून ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला… असं जया बच्चन यांना विचारण्यात आलं. तेव्हा जया बच्चन म्हणाल्या, ‘यावर माझी तक्रार आहे. पण मला काधी यावर बोलण्याची संधी मिळाली नाही.. जर शाहरुख खान घरी असता तर त्याच्या कानशीलात लगावली असती. जसं मी माझ्या मुलाला मारते…’ सांगायचं झालं तर बच्चन कुटुंबासोबत शाहरुख खान याचे चांगले संबंध आहेत.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...