‘मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा, बिचारे अमिताभ’, त्या व्हिडीओमुळे जया बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर
सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवा केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन फोटोग्राफर्ससोबत आणि चाहत्यांसोबत विचित्र वागत असतात. त्यांचे फोटोग्राफर्सवर किंवा चाहत्यांवर चिडतानाचे व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांनी चाहतीसोबत जे कृत्य केले आहे ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता नेमकं काय झालं चला पाहूया…
काय आहे व्हिडीओ?




सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा मनोज कुमार यांच्या शोक सभेतील आहे. या सभेला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यामध्ये जॉनी लिव्हर, आशा पारेख, आमिर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, पद्मिनी कोल्हापुरे, प्रेम चोप्रा, उदित नारायण, जया बच्चन, रंजीत आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान, जया बच्चन एका व्यक्तीसोबत गप्पा मारत असताना. तेवढ्यात एक महिला त्यांचा हात पकडते. हात कोणी पकडला हे पाहण्यासाठी जया बच्चन मागे वळतात. तर ती महिला फोटोसाठी त्यांना विनंती करते. ते पाहून जया बच्चन यांना राग अनावर झाला आहे. त्या महिलेवर चिकडतात. ते पाहून ती महिला आणि तिचा पती त्यांची माफी मागतो.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी सुनावले
सोशल मीडियावर जया बच्चन यांचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. एका यूजरने ‘बिचारे अमिताभ बच्चन’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पाहिजे.. ही दीदी पब्लिकसाठी घातक आहे’ अशी कमेंट केली आहे. एका दृष्टीने पाहायला गेले तर जया बच्चन या शोकसभेला आल्या होत्या. तिथे चाहतीसोबत फोटो काढणे त्यांना योग्य वाटत नसेल. म्हणून त्यांनी फोटोला नकार दिला. पण त्या ज्या प्रकारे चाहतीसोबत वागल्या ते अत्यंत चुकीचे होते असे म्हटले जात आहे.

Comments
अभिनेते मनोज कुमार यांचे 4 एप्रिल रोजी पहाटे 3.30 वाजता निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 5 एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर 6 एप्रिल रोजी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी या सभेला हजेरी लावली.