‘तारक मेहता’चा सोढी परतला, मिसेस सोढीचे मोठे भाष्य, म्हणाली, माझ्या मनात..
तारक मेहता मालिकेतून गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. गुरुचरण सिंग याच्यासाठी सर्वजण प्रार्थना करताना देखील दिसले. आता गुरुचरण सिंग याच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती मिळाली, ज्यानंतर सर्वांनाच आनंद झाला.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून सर्वांचे मनोरंजन करणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाला होता. गुरुचरण सिंग हा 22 एप्रिल 2024 ला मुंबईला जाण्यासाठी आपल्या दिल्लीतील घरातून बाहेर पडला. मात्र, अभिनेत्यासोबत कोणताच संपर्क होत नव्हता. यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. अभिनेता बेपत्ता झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर पोलिस त्याचा शोध घेत होते. दिल्लीच्या पालम परिसरात अभिनेता एका सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. आता अभिनेता घरी परतला आहे.
गुरुचरण सिंग हा धार्मिक यात्रेवर गेला होता. गुरुचरण सिंग हा वापस आल्याने त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतलाय. गुरुचरण सिंगच्या प्रकरणात चाैकशी करण्यासाठी पोलिस थेट तारक मेहता का उल्टा चश्माच्या सेटवर देखील पोहचले होते. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर त्याचे चाहते त्याच्यासाठी सतत प्रार्थना करताना दिसले.
तारक मेहता मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने नुकताच मोठे भाष्य केले आहे. गुरुचरण सिंग सुरक्षित वापस आल्यानंतर जेनिफर मिस्त्री म्हणाली की, खरोखरच ही खूप चांगली बातमी आहे. जवळपास एक महिन्यापासून तो बेपत्ता होता. आई वडिलांपासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वचजण यादरम्यान तणावात होते.
मला हे माहिती होते की, तो नक्कीच वापस येईल. माझ्या मनात होतेच की, तो धार्मिक यात्रेला वगैरे गेलेला असावा. मी खूप आनंदी आहे की, तो वापस आलाय. मला ही खात्री आहे की, त्याचेही पालक आनंदात असतील. गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. तारक मेहता मालिकेतील अनेक कलाकारांनी देखील मोठा धक्का बसला होता.
अनेकांनी गुरुचरण सिंग हा सुरक्षेत वापस यावा, यासाठी प्रार्थना केली होती. गुरुचरण सिंग याने तारक मेहता मालिकेत अनेक वर्ष सोढीची भूमिका साकारली आहे. गुरुचरण सिंगने 2020 मध्येच तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली. आजही लोक हे गुरुचरण सिंगला सोढीच्या नावानेच ओळखतात. गुरुचरण सिंग हा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसतो.