Jenifer Mistry | तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडल्यानंतर जेनिफर मिस्त्रीला मिळाला मोठा प्रोजेक्ट, थेट
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या पंधरा वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तारक मेहता मालिका गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडली आहे. सतत मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप हे केले जात आहेत. जेनिफर मिस्त्रीने असितकुमार मोदीवर आरोप केले.
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या काही वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसते. तारक मेहता मालिकेच्या प्रत्येक पात्रावर चाहते प्रचंड प्रेम करताना कायमच दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील कलाकार हे मालिकेला कायमची सोडचिठ्ठी देऊन जाताना दिसत आहेत. तारक मेहता अर्थात सर्वांचे आवडते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी काही दिवसांपूर्वीच मालिका सोडलीये. काही दिवसांपूर्वीच मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात जेनिफर मिस्त्री बंसीवाल (Jenifer Mistry) हिने देखील मालिकेला कायमचा रामराम केला आहे.
जेनिफर मिस्त्री हिने फक्त मालिकाच सोडली नाही तर तिने मालिकेच्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जेनिफर मिस्त्री बंसीवाल हिने केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. फक्त जेनिफर मिस्त्री बंसीवाल हिच नाही तर मालिकेत काम केलेले काही कलाकार हे देखील मालिकेच्या निर्मात्यांच्या विरोधात बोलताना दिसले.
अनेक वर्षे तारक मेहता मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारताना जेनिफर मिस्त्री ही दिसली. आता जेनिफर मिस्त्री हिने एक व्हिडीओ शेअर करत मोठी घोषणा केली आहे. जेनिफर मिस्त्री म्हणाली की, बरीच वर्षे एकच पात्र साकारत होते. आता शेवटी वेगळ्या भूमिकेमध्ये मी तुमच्या भेटीला आलीये.
एका म्यूझिक व्हिडीओमध्ये काम करताना जेनिफर मिस्त्री ही दिसली आहे. विशेष म्हणजे या म्यूझिक व्हिडीओची शूटिंग जबलपूरला तिच्या गावी झाल्याचे देखील जेनिफर मिस्त्री हिने म्हटले आहे. मालिकेत काम करत असताना या गोष्टी करणे शक्य होत नसल्याचे सांगताना देखील जेनिफर मिस्त्री ही दिसली आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री ही सतत असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. जेनिफर मिस्त्री हिने काही दिवसांपूर्वीच असित कुमार मोदी यांच्यावर थेट लैंगिक छळाचा आरोप केला होता. जेनिफर मिस्त्री हिचे आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला.