TMKOC | ‘आयुष्य इतकं बदलेल याची कल्पना..’; दिवंगत भावासाठी जेनिफर मिस्त्रीची भावूक पोस्ट

जेनिफरने 'तारक मेहता..'चे निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जेनिफरनंतर मालिकेतील काही इतर कलाकारसुद्धा पुढे आले आणि त्यांनीसुद्धा निर्मात्यांवर विविध आरोप केले. जेनिफरने जवळपास 14 वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम केलं होतं.

TMKOC | 'आयुष्य इतकं बदलेल याची कल्पना..'; दिवंगत भावासाठी जेनिफर मिस्त्रीची भावूक पोस्ट
जेनिफर मिस्त्रीने शेअर केले फोटोImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 9:24 AM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. मालिकेच्या सेटवरील हे फोटो असून तिने तिच्या दिवंगत भावाच्या आठवणी सांगितल्या आहेत. या मालिकेच्या एका खास एपिसोडसाठी जेनिफरच्या भावाने शूट केलं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसांनी त्याचं निधन झालं. ‘तारक मेहता..’च्या नवरोजच्या (पारसी नवीन वर्ष) विशेष एपिसोडमध्ये जेनिफरचा भाऊ झळकला होता. सेटवरील भावासोबतचे काही फोटो शेअर करत जेनिफरने त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जेनिफरची भावूक पोस्ट

‘गेल्या वर्षी याच तारखेचे हे फोटो आहेत. जेव्हा माझा भाऊ आदिल मिस्त्री आणि त्याच्या कुटुंबीयांनी ‘तारक मेहता’च्या नवरोज विशेष एपिसोडमध्ये काम केलं होतं. त्यावेळी हे फोटो पोस्ट करण्याची संधी मिळाली नव्हती कारण माझा लहान भाऊ माल्कम रोनाल्ड मिस्त्री याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 21 दिवसांनी त्याचं निधन जालं. तुम्ही आयुष्य प्लॅन करू शकत नाही’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

हे सुद्धा वाचा

या पोस्टमध्ये जेनिफरने पुढे लिहिलं, ‘इतक्या कमी वेळात आयुष्य इतकं बदलेल याची कल्पनासुद्धा केली नव्हती. माल्कम आम्हाला सोडून कायमचा गेला, मी आता मालिकेत काम करत नाही, मित्र आणि समाज म्हणवणारी काही लोकं माझ्या आयुष्यातून गेली आणि या सर्वांत ही गोष्ट विसरू शकत नाही की कुटुंबीय आणि मोजक्या खऱ्या मित्रांशिवाय कोणीच साथ दिली नाही. माझ्या आयुष्यात जितके कठीण प्रसंग आले, तितकी मी शक्तीशाली होत गेली. मी नेहमी हेच म्हणते की, मी माझं आयुष्य कधीच प्लॅन करत नाही. पण देवाने मला नेहमीच सर्वोत्कृष्ट दिलं आहे. त्यामुळे मी फक्त प्रवाहानुसार वाहत जातेय.’

जेनिफरने ‘तारक मेहता..’चे निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जेनिफरनंतर मालिकेतील काही इतर कलाकारसुद्धा पुढे आले आणि त्यांनीसुद्धा निर्मात्यांवर विविध आरोप केले. जेनिफरने जवळपास 14 वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम केलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून तिने मालिकेत काम करणं बंद केलं आहे. निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली होती , “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...