झोपडपट्टीतील मुलांच्या भविष्याला आकार देणारा ‘झुंड’; संघर्ष आणि जिद्दीची कहानी
दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या प्रतिभेला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या नुकताच प्रदर्शित झालेली त्याची अँथोलॉजी वैकुंठ बघा. यामध्ये नायक आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत नागराज आहे. त्याच्या फँड्री आणि सैराटने त्याचं स्थान निश्चित केले आहे. चित्रपट, लघूपट अशा माध्यमातून तो भेटत आला असला तरी तो एक धीरगंभीर कवी आहे, हे त्याच्या उन्हाच्या कटाविरुद्ध या कवितासंग्रहानेसुद्धा सिद्ध केले आहे.
मुंबईः चित्रपटगृहातून चार मार्चला येणाऱ्या झुंड अनेक गोष्टींसाठी आता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या चित्रपटाचा नायक (Hero) आणि दिग्दर्शकाच्या (Director) नजरेतून जर या फिल्म इंडस्ट्रीकड (Film Industries) जर तुम्ही बघत असाल तर हे झालेलं हा चांगला मिलाफ आहे. झुंडमध्ये बॉलीवूचा शहेनशहा अमिताभ बच्चन या मुख्य भूमिकेत आहे. ते पहिल्यांदाच अशी व्यक्तिरेखा साकारत आहेत. जे शोषित, वंचित मुलांचा असणारा तो महानायक आहे. जी अशी व्यक्ती आहे जिनं आपली सगळं आयुष्य झोपडपट्टीतील मुलांचं भविष्य घडविण्यासाठी घालवलं आहे. होय अगदी बरोबर आहे, आपण चर्चा करतोय ती, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची. नागपूरचे असलेले बारसे या क्रीडा शिक्षकांच्या आयुष्यावर बेतलेला ही झुंड आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या प्रतिभेला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या नुकताच प्रदर्शित झालेली त्याची अँथोलॉजी वैकुंठ बघा. यामध्ये नायक आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत नागराज आहे. पण त्याआधी आलेल्या त्याच्या फँड्री आणि सैराटने त्याचं स्थान निश्चित केले आहे. चित्रपट, लघूपट अशा माध्यमातून नागराज भेटत आला असला तरी तो एक धीरगंभीर कवी आहे, हे त्याच्या उन्हाच्या कटाविरुद्ध या कवितासंग्रहानेसुद्धा त्याने दाखवून दिले आहे.
सुखद असण्यापेक्षा दुःखदायक
मुख्यतः नागराज मंजुळे हा मराठी चित्रपटासाठी ओळखला जात असला तरी त्याच्या पिस्तुल्या या लघुपटाला 2010 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. इंदिरा गांधी पुरस्कारही त्याला प्राप्त झाला आहे. तर 2016 मध्येही त्याच्या सैराट चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले आहे. नागराज मंजूळे यांच्या चित्रपटात सामाजिकतेचा एक गंभीर सूर असतो, तो समाजशील आणि भावनाप्रधान असलेली लोकं त्याची दखल घेतात. फँड्री आणि सैराट या दोन्ही चित्रपटात प्रेम हा मध्यबिंदू असला तरी तो सुखद असण्यापेक्षा दुःखदायक असतो. आणि तो मनाला लागणारा असतो. सैराटसारख्या सिनेमा परश्या आणि आर्चीच्या प्रेमाचं रुपांतर लग्नासारख्या आनंदी गोष्टीत झालं असलं तरी, ते शेवटी एक दुःख देतं. नागराज मंजूळे यांनी या दोन्ही चित्रपटातून त्याने सामाजिकव्यवस्थेवरच जोरदार प्रहार केला आहे. त्यामुळे नागराज मंजुळेची येणाऱ्या झुंडीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
झुंडः स्लम सॉकर
नागपूरमध्ये राहणारे विजय बारसे हे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक आहेत. 1999 ची गोष्ट आहे. ती गोष्टच इतकी प्रेरणादायी आहे की, प्रत्येकाला ती प्रेरणा देणारी ठरणारी आहे. समाजात राहणाऱ्या माणसाची कथा झुंडमध्ये वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आली आहे. माणसं समाजाकडे किती दयेच्या मायेच्या नजरेनं बघतात ते विजय बारसे या व्यक्तिरेखेतून कळतं. शिक्षक असणारा माणूस नंतर मनानं आणि कार्यानं शिक्षक कसा राहतो. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण समाजाचं एक देणं लागतो ते देणं काय असते ते झुंड पाहिल्यानंतरच लक्षात येईल. त्यात अमिताभ सारख्या कलाकारानं आपल्या अभिनयाच्या जोरावर ते ती व्यक्तीरेखा उभा करणं म्हणजे चित्रपटाला सगळे स्टार मिळण्यासारखे आहेत. एक शिक्षक काय काय करु शकतो ते बघायचं असेल तर झुंड बघावीच लागेल. झोपडपट्टी म्हटलं की लोकांच्या नजरा बदलतात, पण याच झोपडपट्टीनं स्लम सॉकरमधून काय घडवतात ते या सिनेमा पाहिल्यानंतर लक्षात येणार आहेत.
खरा नायकः विजय बारसे
विजय बारसे यांनी स्लम सॉकरच्या मुलांच्या फुटबॉलसाठी आपल्या सेवानिवृत्तीनंतर 18 लाख रुपये खर्च करुन खेळाच्या मैदानासाठी ते जमिन घेतात. आज त्यांच्या अकॅडमीमध्ये शोषित वंचितस्तरातील मुलं येऊन फुटबॉल खेळतात, शिकतात आणि राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कोरतात. त्यांच्या अकॅडमीमधील अखिलेश नावाच्या मुलाचा समावेश भारतीय संघात निवड झाली आहे, ज्याने नंतर भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
संघर्षाची कहाणी
विजय बारसे यांना सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते 2012 मध्ये रिअल हिरो अवॉर्डन गौरवण्यात आले आहे. तर अमिर खानच्या सत्यमेव जयते मध्ये विजय बारसे हे गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपली संघर्षाची कहाणी सगळ्या जगाला सांगितली होती. स्लम सॉकरने फक्त झोपडपट्टीतील मुलांना खेळायलाच तेवढं शिकवलं नाही तर नशा आणि गुन्हेगारी जगतापासून लांब रहायला शिकवलं.
कथेचा केंद्रबिंदू अमिताभ
गेल्या पाच वर्षापासून झुंड चित्रपटाची चर्चा सुरू आहे. त्यानंतर नागराज मंजुळेंनी अमिताभ बच्चन यांना घेऊन या चित्रपटाचे चित्रीकरण करतो अशा बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या क्रिडांगणावर सेट लागला असतानाही त्याचे चित्रीकरण झाले नाही, त्यानंतर अमिताभ बच्चन दुसऱ्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी झाले आणि शूटींग पुन्हा लांबले. त्यानंतर बातम्या अशाही आल्या की अमिताभने नागराज मंजूळेची झुंड सोडली आहे. पण नागराज मंजुळेंनी ज्यावेळी या चित्रपटाची कथा लिहिली तेव्ही बिग बींनी समोर ठेऊनच ती कथा लिहिली होती. त्यामुळे त्यांना घेऊनच तो हा फिल्म करणार होता. बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की, अमिताभ बच्चन बरोबर एक तरी प्रोजेक्ट करावा, नागराज मंजूळे म्हणतो या सिनेमात जर बिग बी नसते तर हा चित्रपट मी दिग्दर्शितच केला नसता.
दुहेरी मिलाफ नागराज आणि अमिताभ
अमिताभ बच्चन या शतकातील एक महानायक आहे. त्याच्या अभिनयावर प्रत्येक जण फिदा असतो. त्याच्या अँग्री यंग मॅन पासून ते अगदी त्याने साकारलेला पोलीस ऑफिसरवर सगळा देश फिदा झाला आहे. हमाली करणाऱ्या माणसांचा नायक म्हणून जेव्हा तो पडद्यावर कुली बनून आला तेव्हा ज्यांचा आवाज, ज्यांच्या वेदना कुणीच ऐकत नाहीत त्यांचा तो आवाज बुलंद झाला. झुंडमधून ते पहिल्यांदाच एक दलित नायकाच्या रुपाने ते पडद्यावर येत आहेत. झुंडची घोषणा झाल्यापासून चाहते जसे झुंड बघण्यासाठी उत्सुक आहेत तसेच अमिताभ बच्चनही ही भूमिका साकारण्यासाठी उत्सुक होते. दिल्ली विद्यापीठातील चित्रपट लेखक मिहीर पांडे यांनी एका चर्चेदरम्यान सांगितले की, नागराज मंजुळेची झुंड ही पहिलीच हिंदी फिल्म आहे, आणि त्यात अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका आहे. मंजूळेंचा चित्रपटप्रवास बघितला तर असे लक्षात येईल की, त्याच्या नव्या चित्रपटाचे कथानक हे शोषित आणि वंचित घटकावर असेल, त्यातील कथेचा नायक हा दलित नायक आहे. मिहिर पांडे पुढे असेही म्हणतात की, अमिताभ सारखा आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकार एका मागासलेल्या समाजातील नायकाची भूमिका साकारत असेल तर त्याचा अभिनय बघणं म्हणजे अपेक्षिततेपेक्षा त्याचा आसर कितीतरी धारदार असेल.
संबंधित बातम्या
मलायका अरोराच्या बिकनी फोटोवरची अर्जुन कपूरची कमेंट पाहिली आहे का?, म्हणून तो आता चोर ठरतोय