‘फक्त लोकांना दाखवण्यासाठी मी…’, जिग्ना वोरा यांच्याकडून संताप व्यक्त, सर्वत्र खळबळ

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' च्या घरातून बाहेर आल्यानंतर जिग्ना वोरा यांनी व्यक्त केला संताप; म्हणाल्या, 'फक्त लोकांना दाखवण्यासाठी मी...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जिग्ना वोरा यांची चर्चा... 'बिग बॉस 17' मधील वातावरण आणि स्पर्धकांबद्दल जिग्ना वोरा यांचं स्पष्ट वक्तव्य

'फक्त लोकांना दाखवण्यासाठी मी...', जिग्ना वोरा यांच्याकडून संताप व्यक्त, सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 10:47 AM

मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : ‘बिग बॉस 17’ च्या घरातून जिग्ना वोरा बाहेर झाल्या आहेत. एविक्शनमुळे जिग्ना वोरा बिलकूल आनंदी नसल्याचं चित्र समोर येत आहे. ‘बिग बॉस 17’ च्या घरातून बाहेर आल्यानंतर जिग्ना वोरा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी संताप देखील व्यक्त केला. नुकताच झालेल्या मुलाखतीत जिग्ना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले, लोकांना माझा स्वभाव आवडला नाही….’ त्यामुळे बिग बॉसच्या स्पर्धकांनी जिग्ना वोरा यांनी नॉमिनेट केलं… सांगायचं झालं तर जिग्ना यांच्यासोबतच, अंकिता लोखंडे, यूके रायडर अभिनव, सनी तहलका हे स्पर्धक देखील नॉमिनेशन्सच्या यादीमध्ये होते. पण जीन्हा वोरा यांचा बिग बॉस मधील प्रवास संपला.

शोमधून बाहेर आल्यानंतर जिग्ना वोरा म्हणाल्या, ‘बिग बॉसच्या घरात एकून 15 स्पर्धक होते. मी प्रत्येकासोबत बोलयचे… घरातील प्रत्येक गोष्टीत मी सक्रिय होती. मला कोणाच्या मागे बोलायला आवडत नाही. मला स्वतःवर गर्व आहे कारण मी फेक नाही. फक्त लोकांना दाखवण्यासाठी मी काहीही करत नाही. बिग बॉसच्या घरात, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील मुखवटे पाहिले, परंतु माझ्या बाबतीत असे घडले नाही, कारण मी शेवटपर्यंत जशी होती तशीच पाहिली. त्यामुळे माझ्या प्रवासात मी आनंदी आहे…’

जिग्ना वोरा पुढे म्हणाल्या, ‘बिग बॉसमध्ये प्रत्येकाच्या मना काही आणि ओठांवर दुसरं काही आहे. म्हणून त्यांना माझ्यातील चांगलेपणा आवडलेला नाही. मी बाहेर असल्याचं हेच एक कारण आहे. जर तुम्ही लोकांची फसवणूक करत असाल, विचार करुन पुढचं पाऊल टाकत असाल, स्ट्रॅटजी बनावत असाल.. तर तुम्ही शोमध्ये आरामात पुढचा टप्पा गाढू शकता..’

हे सुद्धा वाचा

‘जे लोकांच्या मनापासून बिग बॉसमध्ये खेळतात, सर्वांसोबत चांगला व्यवहार ठेवतात. त्यांचं बिग बॉसमध्ये भविष्य नाही…’असं देखील जिग्ना वोरा म्हणाल्या. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जिग्ना वोरा यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जिग्ना वोरा मुलाखतींच्या माध्यमातून संताप व्यक्त करताना दिसत आहे.

चाहत्यांमध्ये ‘बिग बॉस 17’ चर्चेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील अंकिता हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. प्रेग्नेंसीची चर्चा रंगलेली असताना अभिनेत्रीचे प्रेग्नेंसी रिपोर्ट लीक झाले आणि अंकिता प्रेग्नेंट नसल्याची माहिती समोर आली.

एवढंच नाही तर, ईशा आणि समर्थ देखील गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहेत. अनेकदा दोघे कॅमेऱ्यासमोर रोमाँटिक होताना दिसले. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता ‘बिग बॉस 17’ च्या घरात पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.