जिग्ना वोरा यांनी केली सना रईस खान हिची पोलखोल, थेट सांगितले ‘बिग बाॅस 17’च्या विजेत्याचे नाव, अंकिता आणि विकीबद्दल…

बिग बाॅस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नुकताच झालेल्या विकेंडच्या वारमध्ये धमाका झाला. सलमान खान याने जवळपास घरातील प्रत्येक सदस्याचा क्लास लावला. बिग बाॅस 17 ला अजूनही टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. बिग बाॅस 17 बद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.

जिग्ना वोरा यांनी केली सना रईस खान हिची पोलखोल, थेट सांगितले 'बिग बाॅस 17'च्या विजेत्याचे नाव, अंकिता आणि विकीबद्दल...
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 9:06 AM

मुंबई : बिग बाॅस 17 च्या विकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्य हे ढसाढसा रडताना दिसले. घरात काही वेळ भावनिक वातावरण हे बघायला मिळाले. क्राईम पत्रकार जिग्ना वोरा नुकताच बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्या आहेत. जिग्ना वोरा बिग बाॅसमधून बाहेर जात असल्याचे कळताच मुनव्वर फारुकी हा थेट रडायला लागला. आता नुकताच जिग्ना वोरा यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना जिग्ना वोरा या दिसल्या आहेत. थेट सना रईस खान हिची पोलखोल जिग्ना वोरा यांच्याकडून करण्यात आलीये. तिचा खरा चेहरा हा दाखवला आहे.

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन आणि सना हे एकमेकांचे हात पकडून बसल्याचे दिसले. ही गोष्ट सर्वांनाच खटकली. अनेकांनी तर थेट म्हटले की, विकी जैन याच्यावर सना लाईन मारत आहे. मात्र, याबद्दल अंकिता लोखंडे हिला अजिबातच काहीच कल्पना नाहीये.

यावर जिग्ना वोरा यांनी खुलासा केलाय. जिग्ना वोरा म्हणाल्या की, मुळात म्हणजे सना ही नाॅमिनेशनपासून प्रचंड घाबरते. काहीही करून सना हिला बिग बाॅस 17 मध्ये राहायचे आहे. सना हिला चांगले माहिती आहे की, आपल्याला बिग बाॅस 17 च्या घरात अधिक दिवस राहायचे असेल तर आपल्याला विकी जैन याच्यासोबत राहणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी ती सर्वकाही करत आहे.

जिग्ना वोरा यांनी यावेळी थेट बिग बाॅस 17 च्या विजेत्याबद्दल थेट सांगून टाकले आहे. जिग्ना वोरा म्हणाल्या, बिग बाॅस 17 चा विजेता हा मुनव्वर फारुकी असेल, तो चांगला गेम खेळत आहे. यावेळी थेट अंकिता आणि विकी जैन यांच्या रिलेशनबद्दल देखील जिग्ना वोरा यांनी भाष्य केले. कारण बिग बाॅसच्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत.

जिग्ना वोरा म्हणाल्या, मुळात म्हणजे विकी भाई घरात गेममुळे खूप व्यस्त आहे. यामुळेच तो अंकितो लोखंडे हिला अजिबात वेळ देत नाही. विकी वेळ देत नसल्यामुळे अंकिता लोखंडे हिची चिडचिड होत असल्याचे जिग्ना वोरा यांनी म्हटले आहे. बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून मोठी भांडणे विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये बघायला मिळत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.