भावासाठी वाट्टेल ते करायला तयार..; आलिया भट्टच्या ‘जिगरा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

आलिया भट्टच्या 'जिगरा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिच्यासोबत वेदांग रैना मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमधील आलिया आणि वेदांग यांचं अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडलंय.

भावासाठी वाट्टेल ते करायला तयार..; आलिया भट्टच्या 'जिगरा'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
Jigra trailerImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 2:08 PM

अभिनेत्री आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जिगरा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वसन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलियाने सत्याची भूमिका साकारली आहे. एका दक्षिणपूर्व आशियाई देशात अटक झाल्यानंतर भावाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या बहिणीची (सत्या) ही कथा आहे. या चित्रपटात आलिया आणि वेदांगसोबतच मनोज पाहवा यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांदाच ॲक्शनपटात जबरदस्त ॲक्शन सीन्स करताना दिसणार आहे. भावाच्या सुटकेसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या बहिणीच्या जबरदस्त भूमिकेत आलियाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. पुन्हा एकदा तिच्या दमदार अभिनयाची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळतेय. यातील काही दृश्ये अंगावर अक्षरश: काटा आणतात.

या ट्रेलरमध्ये पहायला मिळतंय की सत्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करत असते. तिच्या भावाला अटक झाल्यानंतर ती परदेशात जाते. भावाची सुटका करण्यासाठी वाट्टेल ते करायची तिची तयारी असते. सत्याच्या भावाला खोट्या आरोपाखाली अटक केल्याचं दिसून येतंय. यात मनोज पाहवा हे सत्याच्या गुरू/वडिलांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात ॲक्शन सीन्सचा भरणा असला तरी त्याला भावनिक कथेची जोड आहे. आलियाच्या भावाच्या भूमिकेतील वेदांगने याआधी ‘द आर्चीज’ या चित्रपटात काम केलं होतं. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात काही स्टारकिड्सने भूमिका साकारल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

‘जिगरा’ हा आलियाचा या वर्षातील पहिलाच चित्रपट असेल. गेल्या वर्षी तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्येही पदार्पण केलं होतं. ‘जिगरा’शिवाय आलिया यशराज फिल्म्सच्या ‘अल्फा’ या चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये शर्वरी वाघचीही भूमिका आहे. ‘जिगरा’ हा चित्रपट येत्या 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.