Jodha Akbar फेम अभिनेत्रीला ओळखणंही कठीण, 13 वर्षात झालेत इतके बदल

| Updated on: May 17, 2024 | 3:52 PM

Jodha Akbar | ऑनस्क्रिन अकबरच्या जोधाला पाहून व्हाल थक्क; अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोची सर्वत्र तुफान चर्चा... 13 वर्षात झालेत इतके बदल... सध्या सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त परिधी शर्मा हिच्या लूकची चर्चा... फोटो तुफान व्हायरल

Jodha Akbar फेम अभिनेत्रीला ओळखणंही कठीण, 13 वर्षात झालेत इतके बदल
Follow us on

टीव्ही विश्वातील अशा अनेक मालिका आहेत, ज्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण तरी  देखील मालिका आणि मलिकांमधील कलाकारांना चाहते विसरू शकलेले नाहीत. असंच काही ‘जोधा अकबर’ मालिकेचं झालं आहे. मालिकेला संपूर्ण अनेक वर्ष झाली आहेत. पण सोशल माडियावर मालिकेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ‘जोधा अकबर’ मालिकेत अभिनेता रजत टोकस याने अकबर तर परिधी शर्मा हिने जोधा या भूमिकेला न्याय दिला. 18 जून 2013 मध्ये सुरू झालेल्या ‘जोधा अकबर’ मालिकेने 7 ऑगस्ट 2015 मध्ये चाहत्यांचा निरोप घेतला. मालिका संपून अनेक वर्षे झाले असले तरी देखील मालिकेतील कालाकारांची चर्चा तुफान रंगलेली असते.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री परिधी शर्मा हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने साध्या लूकमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘जीवन विपुलतेने जगण्यासाठी साधं राहा…‘ असं लिहिलं आहे . सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

परिधीने खिडकीत बसून फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ‘नो मेकअप’लूकमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.  ‘जोधा अकबर’ मालिकेनंतर रजत आणि परिधी यांच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. आज देखील अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

जोधा अकबर मालिकेत झळकण्यापूर्वी अभिनेत्रीने करियरच्या सुरुवातील खलनायकाच्या भूमिका देखील साकारल्या होत्या. पहिल्यांदा अभिनेत्री 2010 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ मध्ये दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री ‘रुक जाना नही’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

 

 

परिधी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.