Jodha Akbar | ऑनस्क्रिन अकबरच्या जोधाला पाहून व्हाल थक्क; ‘नो मेकअप’ लूकमध्ये अभिनेत्रीला ओळखणं कठीण

'जोधा अकबर' फेम परिधि शर्मा हिच्या लूकमध्ये ८ वर्षात मोठं बदल, सध्या व्हायरल होत असलेला फोटो पाहून व्हाल थक्क... फोटो एकदा पाहाच...

Jodha Akbar | ऑनस्क्रिन अकबरच्या जोधाला पाहून व्हाल थक्क; 'नो मेकअप' लूकमध्ये अभिनेत्रीला ओळखणं कठीण
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 3:00 PM

मुंबई | टीव्ही विश्वातील मालिकांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. आतापर्यंत अनेक मालिका टीव्हीवर प्रसारित झाल्या आणि प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केल्यानंतर मालिकांनी चाहत्यांचा निरोप घेतला. आता देखील अशा एका मालिकेची चर्चा रंगत आहे, ज्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. १८ जून २०१३ मध्ये सुरू झालेल्या ‘जोधा अकबर’ मालिकेने ७ ऑगस्ट २०१५ मध्ये चाहत्यांचा निरोप घेतला. मालिका संपून अनेक वर्षे झाले असले तरी देखील मालिकेतील कालाकारांची चर्चा तुफान रंगलेली असते. ‘जोधा अकबर’ मालिकेत अभिनेता रजत टोकस याने अकबर तर परिधी शर्मा हिने जोधा या भूमिकेला न्याय दिला. आजही मालिकेतील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

‘जोधा अकबर’ मालिकेनंतर रजत आणि परिधी यांच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. पण आता दोघे कुठे आहेत, काय करतात? असे अनेक प्रश्न चाहते विचारत असतात. आता अभिनेत्री परिधी शर्मा हिचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री ‘नो मेकअप’लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

परिधीने गार्डनमध्ये बसून फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ‘नो मेकअप’लूकमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘निसर्गाच्या सानिध्यात…’असं लिहिलं आहे. शिवाय लाल रंगाचा इमोजी देखील पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त परिधी शर्मा हिच्या फोटोची चर्चा रंगत आहे.

अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करत नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘नॅचरल ब्यूटी’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ही तिच जोधा अकबर मधील सुंदर जोधा आहे..’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘साधेपणा हेच तुझं नैसर्गिक सौंदर्य’. अशा प्रकारे परिधीच्या फोटोंवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मालिकेत अकबरची भूमिका साकारणार रजत देखील गेल्या काही वर्षांपासून टीव्ही विश्वापासून दूर आहे. रजत टोकस याने ‘पृथ्वीराज चौहान’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. ‘जोधा अकबर’ मालिकेतील कलाकार आता टीव्ही विश्वात सक्रिय नसले तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असतात.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.