LOVE LIFE | ‘या’ अभिनेत्रीने ९ वर्ष प्रसिद्ध अभिनेत्यावर केलं प्रमे; त्याच्याकडून मात्र अत्यंत वाईट फसवणूक
LOVE LIFE | ९ वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये तिला कधी कळच नाही त्याचं खोटं प्रेम... 'त्या' रात्री अभिनेत्याचं सत्य माहिती पडताच अभिनेत्रीला बसला मोठा धक्का... सर्वांसमोर अभिनेत्रीने कधीच नातं लपवलं नाही... पण त्याने असं काय केलं ज्यामुळे अभिनेत्रीला बसला मोठा धक्का... 'लव्ह स्टोरी'ची सर्वत्र चर्चा...
मुंबई : 16 सप्टेंबर 2023 | प्रेम… बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी एकमेकांना डेट केलं. काही सेलिब्रिटींचं नातं लग्नापर्यंत पोहोतलं. तर काहींनी मात्र आपल्या जोडीदाराची फसवणूक केली. काही सिलेब्रिटींच्या नात्याची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील तुफान रंगली. पण काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशाच सेलिब्रिटी कपल पैकी एक म्हणजे अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री बिपाशा बासू… दोघांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण त्याचं प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही… जॉन अब्राहम याने अभिनेत्रीची फसवणूक केल्यामुळे दोघांचं नातं तुटलं… असं सांगण्यात आलं… तर नक्की दोघांमध्ये काय झालं जाणून घेवू…
एक काळ असा होता जेव्हा जॉन फक्त आणि फक्त त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत होता. पण त्यानंतर अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची देखील तुफान चर्चा रंगू लागली. जॉन याच्या शांत स्वभावामुळे देखील चर्चेत असयाचा. दरम्यान, एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जॉन आणि बिपाशा यांच्यातील नातं प्रेमापर्यंत पोहोचलं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दोघांनी कधीही त्यांचं रिलेशनशिप चाहत्यांपासून लपवलं नाही. बिपाशा आणि जॉन यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येकाला माहिती होतं. जवळपास नऊ वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. अनेक पार्टी आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण जॉन याच्या एका मोठ्या चुकीमुळे नऊ वर्षांच्या नात्याला तडा गेली…
मीडिया रिपोर्टनुसार, २०१४ मध्ये जॉन याने नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत एक ट्विट केलं होतं. ट्विट करत अभिनेता म्हणाला, ‘यंदाच्या वर्षी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंद येवो… लव्ह जॉन आणि प्रिया अब्राहम…’, ट्विट करत अभिनेत्याने बिपाशासह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला… त्यानंतर बिपाशा आणि जॉन कधीच एकत्र दिसले नाहीत.
ट्विट वाचल्यानंतर बिपाशा हिला कळलं की, जॉन आपल्यासोबत प्रिया हिला देखील डेट करत आहे. जॉन आपली फसवणूक करत आहे… हे मोठं सत्य देखील अभिनेत्रीच्या लक्षात आलं. नव्या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या ट्विटनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर अभिनेत्याने गर्लफ्रेंड प्रिया रुंचाल हिच्यासोबत लग्न केलं…
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या धक्क्यातून सावरण्यासाठी बिपाशा हिला मोठा काळ लागला. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयु्ष्यात आनंदी आहे. अभिनेत्री करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत लग्न केलं आहे. करण आणि बिपाशा यांना एक मुलगी देखील आहे. अभिनेत्री कायम मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते… सध्या सर्वत्र बिपाशा आणि करण यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत आहेत.