“OTT वर 299 किंवा 499 रुपयांना विकलं जाणं पसंत नाही”; John Abrahamची परखड भूमिका

चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याच्या दोन महिन्यांनंतर मे मध्ये जॉनचा 'अटॅक' हा चित्रपट ओटीटीवर (OTT) प्रदर्शित झाला होता. मात्र जॉनची पहिली पसंती ही नेहमीच थिएटर्स असणार असल्याचं त्याने स्पष्ट केलंय. जॉन स्वत: एक निर्माता असून ओटीटीबद्दल त्याची मतं इतर कलाकारांपेक्षा बरीच वेगळी आहेत.

OTT वर 299 किंवा 499 रुपयांना विकलं जाणं पसंत नाही; John Abrahamची परखड भूमिका
John Abraham Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 5:28 PM

अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. या ॲक्शन-थ्रिलरची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि भूषण कुमारच्या टी सीरिजने मिळून केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जॉन ओटीटीबद्दल व्यक्त झाला. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याच्या दोन महिन्यांनंतर मे मध्ये जॉनचा ‘अटॅक’ हा चित्रपट ओटीटीवर (OTT) प्रदर्शित झाला होता. मात्र जॉनची पहिली पसंती ही नेहमीच थिएटर्स असणार असल्याचं त्याने स्पष्ट केलंय. जॉन स्वत: एक निर्माता असून ओटीटीबद्दल त्याची मतं इतर कलाकारांपेक्षा बरीच वेगळी आहेत. जॉन अब्राहम इंटरटेन्मेंट या बॅनरअंतर्गत त्याने ‘विकी डोनर’, ‘मद्रास कॅफे’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

“एक निर्माता म्हणून मला ओटीटी आवडतं. ओटीटीच्या प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवायला मला आवडेल. पण एक अभिनेता म्हणून माझी पसंती ती थिएटरलाच आहे”, असं जॉन ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. जॉनने सांगितलं की, लोकांना दर महिन्याला 299 किंवा 499 रुपये देऊन घरी बसून त्यांच्या स्क्रीनवर पाहण्याची कल्पना त्याला आवडली नाही. घरात ओटीटीवर चित्रपट पाहताना मध्येच ते पाहणं थांबवलं किंवा बंद केलेलं त्याला आवडत नाही. मी एक मोठ्या पडद्याचा नायक आहे आणि मला तिथेच राहायचं आहे, असं त्याने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

“मी मोठ्या पडद्याचा हिरो आहे आणि प्रेक्षकांनी मला तिथेच पहावं अशी माझी इच्छा आहे. मी मोठ्या पडद्याला साजेसे चित्रपट करणार आहे. एखाद्याने टॅबलेटवर माझा चित्रपट पाहताना मध्येच वॉशरुमला जाण्यासाठी तो बंद केला तर मला ते आक्षेपार्ह वाटेल. तसंच मला 299 किंवा 499 रुपयांमध्ये उपलब्ध व्हायला आवडणार नाही. मला त्यात समस्या आहे,” असं जॉन म्हणाला. जॉनचा एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट येत्या 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे. मोहित सुरीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.