रोज एक मर्डर पाहायचो, सर्वत्र मृतदेह आणि…, जॉनी लिव्हर यांचा धक्कादायक खुलासा

Johnny Lever | जॉनी लिव्हर यांनी रोज डोळ्यासमोर मर्डर होताना पाहिले आहेत, सर्वत्र मृतदेह आणि वाट काढत जायचे जॉनी... हृदयद्रावक आहे घटना..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॉनी लिव्हर यांची चर्चा

रोज एक मर्डर पाहायचो, सर्वत्र मृतदेह आणि..., जॉनी लिव्हर यांचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 10:51 AM

मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय विनोदवीर जॉनी लिव्हर यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील जॉनी लिव्हर यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक सिनेमे आणि कॉमेडी करत जॉनी लिव्हर यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि गडगंड पैसा कमावला. पण एक काळ असा जेव्हा जॉनी लिव्हर यांच्याकडे स्वतःची आणि कुटुंबाची भूक भागवण्यासाठी देखील पैसे नव्हते. जॉनी लिव्हर अशा ठिकाणी राहायचे ज्याठिकाणी रोज सर्वांसमोर मर्डर व्हायचे आणि सर्वत्र मृत्यूदेह पडलेले असायचे.

एका मुलाखतीत खुद्द जॉनी लिव्हर यांनी यावर मोठा खुलासा केला. जॉनी लिव्हर यांचा बालपण धारावी याठिकाणी गेलं. वडील सतत नशा करत असल्यामुळे जॉनी लिव्हर हैराण झाले होते. घरातील परिस्थिती पाहात वयाच्या 13 व्या वर्षी रेल्वे पटरीवर स्वतःला संपवण्यासाठी गेले. पण तीन बहिणींचा विचार येताच जॉनी लिव्हर यांनी स्वतःचा निर्णय बदलला.

एवढंच नाही तर, जॉनी लिव्हर रोज धारावी येथे मर्डर पाहायचे. ‘आम्ही रोज एक मर्डर पाहायचो. कधी कोणाची हत्या कशी होईल काही माहिती नसायचं. तिसरीत होतो तेव्हा शाळेत जात असताना रस्त्यात एक मर्डर होताना पाहिला आणि मृतदेह फेकून दिला होता. शाळेत जाताना देखील भीती वाटयची कारण रस्ता भयानक होता.’

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, जॉनी लिव्हर यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. आयुष्यात कधी चांगले दिवस येतील याची कल्पना देखील जॉनी लिव्हर यांनी नव्हती. प्रसिद्ध विनोदवीर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यापूर्वी जॉनी लिव्हर रस्त्यावर पेन विकून स्वतःची आणि कुटुंबाची भूक भागवायचे. सेलिब्रिटींची मिमिक्री करत जॉनी लिव्हर पेन विकायचे.

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे जॉनी लिव्हर यांना स्वतःचे शिक्षण देखील पूर्ण करता आलं नाही. जॉनी लिव्हर यांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालं आहे. पण जॉनी लिव्हर आज एक प्रसिद्ध कलाकार आहेत. सोशल मीडियावर देखील जॉनी लिव्हर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.