Jr NTR च्या लग्नात ‘या’ कारणामुळे झाले वाद; शाही विवाहासाठी मोजले तब्बल इतके कोटी!

सर्वसामान्य यांच्याच लग्नामध्ये वाद होत नाहीत, तर सेलिब्रिटींच्या लग्नात देखील होतात वाद, 'या' कारणामुळे ज्युनियर एनटीआर याचं लग्न अडकलं होतं वादाच्या भोवऱ्यात...

Jr NTR च्या लग्नात 'या' कारणामुळे झाले वाद; शाही विवाहासाठी मोजले तब्बल इतके कोटी!
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 12:03 PM

मुंबई : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. सेलिब्रिटी मोठ्या थाटात नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. यासाठी सेलिब्रिटी बक्कळ पैसे देखील खर्च करत आहे. चाहत्यांमध्ये सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा तर रंगलेली असते, पण लग्नात झालेल्या खर्चाची देखील चर्चा तुफान रंगलेली असते. झगमगत्या विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केले. अशाच एका सेलिब्रिटींमधील एक म्हणजे ज्युनियर एनटीआर.. ज्युनियर एनटीआर फक्त दाक्षिणत्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता नसून आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सुपरस्टार एनटी राव यांचं पूत्र आहे. ज्युनियर एनटीआर याने ‘आरआरआर’ सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

‘आरआरआर’ सिनेमानंतर ज्युनियर एनटीआर याच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. ज्युनियर एनटीआर याची चर्चा आता साऊथपर्यंत मर्यादित राहिली नसून साता समुद्रा पार पोहोचली आहे. चाहते कामय ज्युनियर एनटीआर याच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसतात. सध्या ज्युनियर एनटीआर याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. ज्युनियर एनटीआर याचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं.

अभिनेत्याचं लग्न सेलिब्रिटी वेडिंग्समधील सर्वात महागडं लग्न म्हणून चर्चेत आहे. ज्युनियर एनटीआर याच्या लग्नात एक दोन कोटी नाही तर, तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. रिपोर्टनुसार, ज्युनियर एनटीआर याच्या लग्नासााठी कुटुंबियांनी तब्बल १०० कोटी रुपये मोजले होते.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्याच्या लग्नासाठी सजावट देखील महागड्या वस्तूंनी करण्यात आली होती. ज्युनियर एनटीआर याच्या लग्नात तब्बल १५ हजार पाहुणे उपस्थित होते. ज्यामध्ये तीन हजार सेलिब्रिटी आणि १२ हजार चाहते उपस्थित होते. लग्नासाठी बंधण्यात आलेल्या मंडपासाठी तब्बल १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. सध्या सर्वत्र ज्युनियर एनटीआर याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

ज्युनियर एनटीआर याची पती लक्ष्मी हिने लग्नात घातलेली साडी देखील प्रचंड महाग होती… अभिनेत्याच्या पत्नीच्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… पत्नीच्या साडीसाठी अभिनेत्याने तब्बल १ कोटी रुपये मोजले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर लक्ष्मीने साडी दान केली.

अभिनेत्याच्या लग्नातील वाद

ज्युनियर एनटीआर याच्या लग्नाबाबत मोठा वाद रंगला होता. लक्ष्मी हिचं वय लग्नाच्या वेळी फक्त १७ वर्ष होतं. म्हणून लग्नासाठी १ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. लक्ष्मी हिचं वय १८ वर्ष झाल्यानंतर ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी यांनी सप्तपदी घेतल्या…

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.