Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध उद्योजकावर बलात्काराचे आरोप, क्रिकेटच्या मैदानात झालेली ओळख अभिनेत्रीला पडली महागात

धक्कादायक घटना... क्रिकेटच्या मैदानात उद्योजकासोबत झालेली ओळख अभिनेत्री कधीच विसरु शकणार नाही, नकार असताना देखील त्याने अभिनेत्रीसोबत केलं अत्यंत वाईट कृत्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उद्योजकाच्या वाईट कृत्याची चर्चा

प्रसिद्ध उद्योजकावर बलात्काराचे आरोप, क्रिकेटच्या मैदानात झालेली ओळख अभिनेत्रीला पडली महागात
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 11:29 AM

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : जेएसडब्ल्यू (JSW) समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल (MD Sajjan Jindal) यांच्याबद्दल एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. सज्जन जिंदल यांच्या विरोधात एका अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. रिपोर्टनुसार, 13 डिसेंबर रोजी अभिनेत्री बीकेसी पोलीस स्थानकात उद्योजकाविरोधात तक्रार दाखल केली. अभिनेत्रीने केलेल्या आरोपांनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत धक्कादायक घटना जानेवारी 2022 मध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वर असलेल्या पेंटहाऊसमध्ये घडली.

सुरुवातीला अभिनेत्रीच्या तक्रारीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर अभिनेत्रीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर सज्जन जिंदल यांनी केलेल्या वाईट कृत्याची माहिती समोर आली. सध्या सर्वत्र सज्जन जिंदल यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची चर्चा रंगली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत काय म्हणण्यात आलं?

सज्जन जिंदल आणि अभिनेत्रीची पहिली ओळख ऑक्टोबर 2021 मध्ये IPL मॅच दरम्यान झाली होती. दोघे देखील सामना पाहाण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर पोहोचले होते. त्यानंतर दोघांची दुसरी भेट मुंबई याठिकाणी झाली. दरम्यान, संपत्ती खरेदी करायची म्हणून दोघांनी एकमेकांना स्वतःचे मोबाईल नंबर दिले.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, सज्जन जिंदल अभिनेत्रील ‘बेब’ म्हणून हाक मारायचे. एवढंच नाही तर, सज्जन जिंदल त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी अभिनेत्रीला सांगितल्या. एवढंच नाही तर, सज्जन जिंदल यांनी अभिनेत्रीला किस करण्याचा देखील प्रयत्न केला.

2022 मध्ये मीटिंगसाठी जेव्हा अभिनेत्री कंपनीच्या मुख्यालयात पोहोचली तेव्हा सज्जन जिंदल यांनी तिला पेंटहाऊसमध्ये नेले. सज्जन जिंदल यांनी अभिनेत्रीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने नकार दिल्यानंतरही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सज्जन जिंदल सुरूच ठेवला… असं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

अशी धक्कादायक घटना घडल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजकाचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. अभिनेत्री पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचं समजताच उद्योजकाने तिला धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अनेक महिने पोलिसांनी अभिनेत्रीच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. म्हणून अभिनेत्री न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.